Mohammed Shami : न्यूझीलंड विरुद्ध मोहम्मद शमीची निवड का झाली नाही?

Mohammed Shami : शामीच्या दुखापतीविषयी पुन्हा उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे 

338
Mohammed Shami : न्यूझीलंड विरुद्ध मोहम्मद शमीची निवड का झाली नाही?
Mohammed Shami : न्यूझीलंड विरुद्ध मोहम्मद शमीची निवड का झाली नाही?
  • ऋजुता लुकतुके 

न्यूझीलंड विरुद्धच्या आगामी ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी १५ जणांच्या भारतीय संघाची निवड शुक्रवारी करण्यात आली आहे. पण, त्या संघात मोहम्मद शमीचं नाव नाही. गेल्या आठवड्यात शामीचा गुडधा सुजल्या बातमी आली तेव्हा खुद्ध शामी आणि बीसीसीआयनेही ती फेक न्यूज असल्याचं म्हटलं होतं. तो सुधारत असल्याचंही म्हटलं होतं. मग न्यूझीलंड दौऱ्यात शामी का नाही, असा प्रश्न आता पडला आहे. (Mohammed Shami)

(हेही वाचा- Noel Tata : नोएल टाटाच रतन टाटांचे उत्तराधिकारी; टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नेमणूक )

शुक्रवारी निवडलेल्या संधातून यश दयालला वगळण्यात आलंय. बाकी हा संघ आहे तसा आहे. जसप्रीत बुमरावर (Jasprit Bumrah) उपकर्णधारपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे सगळे निर्णय अपेक्षितच होते. पण, ऑस्ट्रेलियाच्या खडतर दौऱ्याआधी शामी खेळेल असं वाटत होतं, तसं मात्र झालेलं नाही. (Mohammed Shami)

मोहम्मद शमी नोव्हेंबर २०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषक संपल्यानंतर भारतीय संघात खेळलेला नाही. स्पर्धेत झालेल्या दुखापतीनंतर अलीकडेच त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर बंगळुरूच्या क्रिकेट अकादमीत तो शस्त्रक्रियेनंतरचे उपचार घेत आहे. अलीकडेच सराव दरम्यान गोलंदाजी केली तर त्याचा गुडघा दुखतो, अशी बातमी पसरली होती. पण, शामीने ही बातमी खोटं असल्याचं स्पष्ट केलं होतं. (Mohammed Shami)

(हेही वाचा- Mahavikas Aghadi : दसऱ्याच्या मुहुर्तावर जागावाटप जाहीर करण्याचा मविआचा निर्णय हुकला; काय झाल्या अडचणी जाणून घ्या…)

आता बीसीसीआयच्या गोटातून अशी बातमी येतेय की, शामीचा सराव व्यवस्थित सुरू असून तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरच लक्ष केंद्रीत करत आङे. भारतातील फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्ट्यांवर तसंही भारताची गोलंदाजी मजबूत आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा दौरा सोडून ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसं खेळता येईल याचा विचार शामी करत आहे. त्याच्या अनुपस्थितीत भारताने आकाश दीपला तिसरा तेज गोलंदाज म्हणून संधी दिली आहे. संघात रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja), रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin), कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि अक्षर पटेल (Axar Patel) हे तिघे फिरकीपटूही आहेत. (Mohammed Shami)

शामीची प्रकृती सुधारत आहे. गोलंदाजीचा सरावही त्याने सुरू केल्याचं समजतंय. (Mohammed Shami)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.