-
ऋजुता लुकतुके
मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) यंदा गुजरात टायटन्स संघाकडून खेळतोय. गेल्या हंगामात बंगळुरूकडून त्याची कामगिरी फारशी चमकदार झाली नव्हती. त्यामुळे बंगळुरूने त्याला सोडचिठ्ठी दिल्यावर गुजरातकडून त्याला संधी मिळाली. यावेळी मात्र तो मैदानात धुमाकूळ घालत आहे. सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध त्याने १७ धावांत ४ गडी गारद केले. आणि तिथेच गुजरातच्या विजयाची पायाभरणी झाली. कारण, हैद्राबादचा संघ १५३ धावांत रोखला गेला आणि गुजरातने मग ७ गडी राखून हा सामना जिंकला.
मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) या हंगामात गुजरातसाठी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. चॅम्पियन्स करंडकात भारतीय संघातून वगळण्यात आल्यावर पेटून उठलेला सिराज आता मैदानात अधिक आक्रमक झाला आहे. ‘चॅम्पियन्स करंडकात मी खेळणार नाही, हे मला पटवून घ्यायला खूपच कठीण गेलं. पण, मी तंदुरुस्ती आणि खेळावर काम करत राहिलो. मी ज्या चुका करत होतो, त्यावर काम केलं. आता मला गोलंदाजी करताना पहिल्यासारखी मजा येतेय,’ असं सिराज म्हणाला.
(हेही वाचा – IPL 2025, Lucknow Super Giants : तेज गोलंदाज मयंक यादव दुखापतीतून पुनरागमन करण्याच्या तयारीत)
– Siraj won POTM award in Bengaluru.
– Siraj won POTM award in Hyderabad.MOHAMMAD SIRAJ – THE SUPERSTAR OF THE GT UNIT. ❤️ pic.twitter.com/14gDYkrf2u
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 6, 2025
काही काळ भारतीय संघाकडून खेळल्यानंतर अचानक वगळलं जाणं हा धक्का होता, हे सिराजने कबूल केलं. ‘तुम्ही राष्ट्रीय संघातून वगळले जाता, तेव्हा तुमच्या मनात सारखे प्रश्न उभे राहतात. आपल्या क्षमतेवरच कधी कधी आपण शंका घेतो. पण, मी फार विचार करायचं टाळलं आणि सरावाला महत्त्व दिलं. महत्त्वाचं म्हणजे मनोधैर्य कायम ठेवलं. आयपीएलवर लक्ष केंद्रीत करायचं तेव्हाच मी ठरवलं आणि तेच आता करतो आहे. समोरचं प्रत्येक आव्हान मी स्वीकारणार आहे,’ असं सिराज (Mohammed Siraj) म्हणाला.
सिराजचा कर्णधार शुभमन गिलही त्याच्या कामगिरीवर खूश आहे. ‘सिराज आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनी गुजरात संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. शिवाय सामना हैद्राबादमध्ये असल्यामुळे सिराजसाठी (Mohammed Siraj) हे घरंच मैदानच होतं. त्याचाही फायदा त्याला मिळाला,’ असं गिल म्हणाला.
(हेही वाचा – BMC : साहाय्यक आयुक्तांनी लोकाभिमुख कार्यपद्धत अवलंबणे गरजेचे)
Siraj is such a spirited hardworking cricketer and it’s good to see that being rewarded.
— Harsha Bhogle (@bhogleharsha) April 6, 2025
आतापर्यंतच्या ३ सामन्यांत १३.०७ च्या सरासरीने सिराजने ९ बळी घेतले आहेत. पर्पल कॅपच्या शर्यतीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई सुपरकिंग्जचा नूर अहमद १० बळींसह पहिल्या स्थानावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचा मिचेल स्टार्क ९ बळींसह सरस सरासरीमुळे दुसऱ्या स्थानावर आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community