-
ऋजुता लुकतुके
पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे सध्याचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांनी अधिकृतपणे आशियाई क्रिकेट परिषदेचा पदभार आता स्वीकारला आहे. श्रीलंकेचे शम्मी सिल्वा यांच्याकडून त्यांनी सूत्र हाती घेतली आहेत. आशियाई क्रिकेटमध्ये हा मोठा खांदेपालट मानला जात आहे. ‘आशियाई क्रिकेट परिषदेचा अध्यक्ष होणं हा मी माझा मोठा बहुमान समजतो. क्रिकेट जगतात आशिया खंड हा खेळाचं ह्रदय आणि फुप्फुस दोन्ही आहे. अशावेळी सगळ्या आशियाई देशांचा समन्वय साधून क्रिकेटच्या वाढीसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यासाठी मी कटीबद्ध आहे,’ असं नकवी यांनी आपल्या अधिकृत पत्रकात म्हटलं आहे. (Mohsin Naqvi)
(हेही वाचा – Ram Navami : इफ्तार आणि ईदला परवानगी आहे, पण राम नवमीला परवानगी नाही; जाधवपूर विद्यापीठात हा कसला नियम ?)
आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा आधी जय शाह त्यानंतर शम्मी सिल्वा आणि आता मोहसीन नकवी यांच्या हातात आली आहे. या कालावधीत आशिया चषकाच्या यशस्वी आयोजनाबरोबरच आयसीसीचाही एकदिवसीय विश्वचषक तसंच चॅम्पियन्स करंडक स्पर्धा आशियात पार पडली आहे. इथून पुढे आशियाई देशांमध्ये क्रिकेटचा आणखी विस्तार करण्यावर काम सुरू आहे. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती इथं आंतरराष्ट्रीय दर्जाची स्टेडिअम उभी राहिली आहेत. (Mohsin Naqvi)
(हेही वाचा – IPL 2025, Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह संघात कधी परतणार, प्रश्नावर हार्दिकचा मोठा अपडेट)
मावळते अध्यक्ष शम्मी डिसिल्वा यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘जय शाह अध्यक्ष असताना आशिया क्रिकेट परिषदेची आर्थिक भरभराट सुरू झाली. आशिया चषकासाठी विक्रमी मार्केटिंग व्यवहार आम्ही करू शकलो. आता तीच गती कायम राखायची आहे. ते काम आता सुरू ठेवायचं आहे,’ असं सिल्वा म्हणाले. आशियाई क्रिकेट आता संघटित झाल्याची भावनाही सिल्वा यांनी बोलून दाखवली. (Mohsin Naqvi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community