ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक 2022 चा थरार चांगलाच रंगला आहे. प्रत्येक सामन्यात रोमहर्षक असा अनुभव मिळत आहे. पण या या विश्वचषकात ऑस्ट्रलियाच्या सामन्यांपेक्षाही भारताच्या सामन्यांना जास्त गर्दी होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियातच ऑस्ट्रेलियन क्रिकेटप्रेमींनी आपल्या संघाकडे पाठ फिरवल्याचे बोलले जात आहे.
ऑस्ट्रेलियात भारताच्या सामन्यांना तुफान गर्दी
मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवण्यात गेलेल्या या सामन्याला रविवार 23 ऑक्टोबर रोजी तब्बल 90 हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. इतकंच नाही तर गुरुवार 27 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात आलेल्या भारत विरुद्ध नेदरलँड्स या सामन्यालाही 36 हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली. पण ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात शनिवार 22 ऑक्टोबर रोजी झालेल्या पहिल्या सामन्याला केवळ 34 हजार 756 प्रेक्षक उपस्थित होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने आपल्या चाहत्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन आवाहन केले आहे.
(हेही वाचाः पाकिस्तानचा रडीचा डाव, कोहलीला टाकलेल्या चेंडूंबाबतचा आक्षेप चुकीचा, वाचा काय सांगतो नियम)
वॉर्नरचे आवाहन
Cmon ऑसी… मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणा-या इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यासाठी संघाला पाठिंबा देण्यासाठी मैदानात उपस्थित रहा, असे आवाहन वॉर्नरने आपल्या चाहत्यांना केले आहे. पण पावसाच्या व्यत्ययामुळे होणारा सामनाच आता रद्द करण्यात आला आहे.
Cmon Aussie! MCG tonight against England. Come out and support the boys! #T20WorldCup pic.twitter.com/1T9VrKzeUI
— David Warner (@davidwarner31) October 28, 2022
सुपर-12 चा ‘सुपर थ्रिल’
ऑस्ट्रेलियाला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुस-या सामन्यात श्रीलंकेवर विजय मिळवला होता. सुपर-12 च्या ग्रुप 1 मधील गुणतक्त्यात मोठा ट्विस्ट आला आहे. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना रद्द झाल्यामुळे या दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण देण्यात आला आहे. त्यामुळे गुण तक्त्यातील पहिल्या चारही संघांना आता 3 गुण मिळाले आहेत. यामध्ये न्यूझीलंड पहिल्या,इंग्लंड दुस-या,आयर्लंड तिस-या तर ऑस्ट्रेलिया चौथ्या स्थानी आहे. त्यामुळे या गटातील आगामी सामने हे प्रत्येक संघासाठी महत्वाचे असल्याचे बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community