Mumbai Football Team : मुंबई सिटी एफसीचे ५ सर्वोत्तम सामने

Mumbai Football Team : सध्या मोहन बागानच्या खालोखाल मुंबई सिटी एफसी संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

162
Mumbai Football Team : मुंबई सिटी एफसीचे ५ सर्वोत्तम सामने
  • ऋजुता लुकतुके

२०२३-२४ हंगामात मुंबई सिटी एफसी संघ उपविजेता ठरला होता. संघात भारताचे आघाडीचे खेळाडू असूनही अंतिम फेरीत मोहन बागानने त्यांना दणका दिला. पण, हंगामात मुंबई संघासाठी काही रंगतदार अनुभवही होते. काही सामने जे थरारक ठरले आणि मुंबईच्या खेळाडूंसाठी यादगार होते. (Mumbai Football Team)

लालियनझुला छांगते हा सुनील छेत्रीनंतरचा भारताचा अव्वल फुटबॉलपटू आहे. मुंबई एफसीमध्ये तो ७ क्रमांकाची प्रसिद्ध जर्सी घालतो. त्याची इंडियन सॉकर लीगमध्ये कामगिरीही तशीच आहे. तर विक्रम सिंग हा संघाचा आणखी एक फॉरवर्डही भारतीय वर्तुळात जानामाना आहे. सॉकर लीगमध्ये मुंबई संघ हा लोकप्रिय आणि यशस्वी संघांपैकी एक आहे. रणबीर कपूर या संघाचा मालक आहे. मुंबई एफसी संघाचे रंगतदार पाच सामने पाहूया, (Mumbai Football Team)

मुंबई वि. गोवा (२०२४)

आयएसएलच्या मागच्या हंगामात मुंबईचा संघ उपविजेता ठरला आणि यात उपांत्य फेरीचा गोव्या विरुद्धचा सामना विशेष लक्षवेधी ठरला. गोवा संघ हा मुंबईचा पारंपरिक प्रतिस्पर्धी. या उपांत्य सामन्यात मुंबईने २-० असा विजय मिळवला. पहिल्या हाफमध्ये गोल झालाच नाही. पण, सघाला गरज असताना डियाझ आणि छांगते संघाच्या मदतीला धावून आले. ६९ आणि ८२ व्या मिनिटाला गोल करत त्यांनी मुंबईला विजय मिळवून दिला. (Mumbai Football Team)

(हेही वाचा – Confidence Petroleum Share Price : तेल कंपन्यांच्या शेअरमध्ये वर्षभरात १८ ते २३ टक्क्यांची उसळी)

मुंबई वि. पंजाब (२०२३)

२०२३-२४ हंगामातील मुंबई एफसी विरुद्ध पंजाब एफसी सामनाही चांगलाच रंगला. ३८ व्या मिनिटाला ल्युका मेसनने पहिला गोल करत पंजाबला खरंतर आघाडी मिळवून दिली होती. पण, त्यानंतर मुंबईने सामना फिरवला. तो सुद्धा शेवटच्या दहा मिनिटांत जॉर्ज डियाझ आणि ग्रेग स्टेवर्ट यांनी ८२ व्या मिनिटाला सलग दोन गोल केले. मुंबई भरगच्च भरलेल्या स्टेडिअममध्ये मुंबईने हा देखणा विजय मिळवला. (Mumbai Football Team)

मुंबई वि. ओडिशा (२०२४)

मागचा हंगाम मुंबईसाठी पिछाडीवरून बाजी मारण्याचाच होता. २०२४ च्या जानेवारीत मुंबई एफसी आणि ओडिशा एफसी संघ आमने सामने आले तेव्हा निकाल २-२ असा लागला. पण, सामना संपेपर्यंत विजयाचं पारडं कुठे झुकणार हे प्रेक्षकांना कळत नव्हतं. पहिला गोल पहिल्या हाफमध्ये ओडिशाने केला. पण, दुसऱ्या हाफच्या सुरुवातीलाच ग्रिफिथने संरक्षकांच्या डोक्यावरून चेंडू भिरकावत १-१ अशी बरोबरी मुंबईला साधून दिली. ओडिशातर्फे ७५ व्या मिनिटाला कृष्णाने दुसरा गोल केला. आता सामना हातातून गेला असं वाटत असतानाच ८९ व्या मिनिटाला डियाझने मुंबईला बरोबरी साधून दिली. शेवटच्या मिनिटाला त्याने हा गोल केला. (Mumbai Football Team)

मुंबई वि. मोहन बागान (२०२३)

मुंबई आणि मोहन बागान यांचं वैर आयएसएलमध्ये जुनं आहे. या द्वंद्वातील एक रंगलेला सामना म्हणजे डिसेंबर २०२३ मध्ये झालेला आणि मुंबईने २-१ असा जिंकलेला सामना. या सामन्यात तब्बल ७ रेड कार्ड रेफरींनी दाखवली. म्हणजे काय हुल्लडबाजी आणि धसमुसळेपणा खेळाडूंनी केला असेल याची कल्पना करा. जेसन कमिंग्जने २५ व्या मिनिटाला मोहन बागानला आघाडी मिळवून दिली. पण, त्यानंतर मुंबईचंच वर्चस्व सामन्यावर राहिलं आणि ४४ आणि ७३ व्या मिनिटाला गोल करत मुंबईने सामना जिंकला. (Mumbai Football Team)

मुंबई वि. हैद्राबाद (२०२२)

मुंबई एफसी संघाचा आणखी एक रंगतदार सामना म्हणजे हैद्राबाद एफसी विरुद्धचा ३-३ असा बरोबरीत सुटलेला सामना. मुंबईचा संघ तेव्हा गतविजेता होता आणि आधीच्याच हंगामात हैद्राबाद संघ विजेता ठरला होता. त्यामुळे सामना रंगतदार होणार हे नक्की होतं. विशेष म्हणजे हे सहाही गोल दुसऱ्या हाफमध्ये झाले. आधी हैद्राबादने एक गोल करायचा आणि पाठोपाठ मुंबईने बरोबरी साधायची असं अखंड चाललं होतं. नॉगेराने सामन्याला ५ मिनिटं उरलेली असताना सामन्यातील सहावा गोल केला आणि मुंबईला बरोबरीही साधून दिली. (Mumbai Football Team)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.