‘मुंबई इंडियन्स नाही तर कोणीच नाही’ म्हणत, हा खेळाडू IPL मधून निवृत्त

144

मुंबई इंडियन्सने आपल्या ५ खेळाडूंना मिनी लिलावाच्या आधीच करारमुक्त केले. यामध्ये मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज कायरन पोलार्डला यंदा करारमुक्त केल्यामुळे हा निर्णय धक्कादायक असल्याचे मानले जात असतानाच, पोलार्डने आता निवृत्ती जाहीर केली आहे. IPL २०२३ च्या मिनी ऑक्शनपूर्वी पोलार्डला रिलीज केल्यानंतर आता पोलार्डने MI सह IPL मधून निवृत्ती जाहीर केली आहे.

( हेही वाचा : ठाणे महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षेविना केली जाणार निवड, मिळेल ३० हजारांपर्यंत पगार)

‘मुंबई इंडियन्स नाही तर कोणीच नाही’

मुंबई इंडियन्समध्ये बदलांची गरज आहे, जर मी मुंबई इंडियन्सकडून खेळू शकलो नाही तर मी स्वत: मुंबई विरुद्ध खेळू शकत नाही. मी कायम मुंबईचाच राहणार आहे. असे पोलार्डने पोस्टमध्ये लिहिले आहे. पोलार्डने IPL कारकीर्द मुंबईसोबत घालवली आहे. त्याने १७१ डावात ३ हजार ४१२ धावा केल्या आहेत. परंतु २०२२ मध्ये त्याला ११ सामन्यात केवळ १४४ धावा करता आल्या याचा संघाला फटका बसला. यानंतर आता पोलार्डने निवृत्ती जाहीर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kieron Pollard (@kieron.pollard55)

IPL मिनी लिलाव

पुढच्या वर्षी २०२३ मध्ये IPL च्या १६ व्या हंगामाला सुरूवात होणार आहे. या हंगामासाठी २३ डिसेंबर रोडी कोचीमध्ये मिनी लिलाव होणार आहे. BCCI ने सर्व IPL संघांना १५ नोव्हेंबरपर्यंत रिटेन खेळाडूंची यादी सादर करण्यास सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.