- ऋजुता लुकतुके
२००७ मध्ये बीसीसीआयने इंडियन प्रिमिअर लीगचा घाट घातला. २००८ च्या जानेवारीत पहिल्या आठ फ्रँचाईजी जगासमोर आणल्या. यात आघाडीवर होती रिलायन्स उद्योग समुहाने ११.९ दशलक्ष अमेरिकन डॉलरची बोली लावलेली मुंबई इंडियन्स ही फ्रँचाईजी. याच नावाचा संघ आयपीएलमध्ये अगदी सुरुवातीच्या हंगामापासून आहे. पहिल्या हंगामात सचिन तेंडुलकर संघाचा आयकॉन खेळाडू होता. पहिल्या दोन हंगामात या संघाला स्पर्धेत फारसं यश मिळालं नसलं तरी २०१० पासून संघाने जोर पकडला. आतापर्यंत तब्बल विक्रमी पाचवेळा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. (Mumbai Indians Players)
(हेही वाचा- Pankaja Munde यांचं राजकीय पुनर्वसन होणार? देवेंद्र फडणवीस यांनी नाव सुचवल्याची माहिती)
गेल्यावर्षी हा संघ १०० दशलक्ष अमेरिकन डॉलर मूल्याचा बनला. हा आकडा पार केलेला आयपीएलमधील हा पहिला संघ ठरला. संघाची कामगिरी जशी बहरत गेली तसं संघाचं मूल्य आणि जाहिरातींचे करारही फुगत गेले आहेत. या घडीला मुंबई इंडियन्स फ्रँचाईजी ब्रँड म्हणून आणि कामगिरी म्हणूनही देशातील एक अव्वल फ्रँचाईजी आहे. हे यश अर्थातच खेळाडूंमुळे मिळालंय. या फ्रँचाईजीचे अव्वल पाच खेळाडू पाहूया. (Mumbai Indians Players)
सचिन तेंडुलकर
आयपीएल सुरू झाली तेव्हा आयकॉन खेळाडू ही संकल्पना होती. मुंबईचा आयकॉन खेळाडू सचिन होता हे वेगळं सांगायला नको. पहिल्या हंगामात तो दुखापतीमुळे खेळू शकला नाही. पण, २००८ ते २०१३ तो मुंबईबरोबर जोडलेला होता. त्यानंतर आजही तो सल्लागार म्हणून संघाबरोबर आहे. २००८ आणि २००९ मध्ये त्याची कामगिरी जेमतेम होती. पण, २०१० मध्ये त्याने ६१८ धावा करत ऑरेंज कॅप पटकावली होती. तर त्याच्या पुढील हंगामात ५५३ धावा करताना त्याने आयपीएलमधील एकमेव शतकही झळकावलं. २०१३ मध्ये मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा आयपीएल जिंकली. तो चषक सचिन तेंडुलकरने उंचावला. (Mumbai Indians Players)
(हेही वाचा- International Yoga Day 2024 : भारताची जगाला अनमोल भेट; आंतरराष्ट्रीय योग दिन)
लसिथ मलिंगा
मुंबई फ्रँचाईजीचा हा सुरुवातीचा शिलेदार. त्याची अचूक गोलंदाजी फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या फलंदाजांनाही जेरीला आणायची. यॉर्कर टाकावा तर तो मलिंगाने. चाहत्यांमध्ये तो खास आवडीचा होता. २००९ ते २०१७ पर्यंत तो मुंबईकडून खेळला. यात त्याने तब्बल १७० बळी मिळवले. त्याची धावगती जेमतेम ७ धावांची होती. स्ट्राईकरेट १६ धावांचा. डावांत ४ बळी त्याने ६ वेळा घेतले. तर १३ धावांत ५ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. मुंबईच्या आयपीएलमधील सुवर्ण काळाचा तो साक्षीदार आहे. (Mumbai Indians Players)
कायरन पोलार्ड
ख्रिस गेलच्या पाठोपाठ आयपीएलमध्ये घणाघाती फलंदाज म्हणून कुणी नाव कमावलं असेल तर ते कायरन पोलार्डने. २०१० ते २०२२ अशी बारा वर्षं त्याने फ्रँचाईजीची सेवा केली. यात फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजी अशी अष्टपैलू कामगिरी बजावली. १८९ सामन्यांत १४७ च्या स्ट्राईकरेटने त्याने तब्बल ३,४१२ धावा केल्या. सोबत ६९ बळीही घेतले. (Mumbai Indians Players)
रोहित शर्मा
रोहित शर्माचं मुंबई इंडियन्सशी अनोखं नातं आहे. फ्रँचाईजीत दाखल व्हायला त्याला २०१३ साल उजाडलं. पण, तो आला तोच विजेतेपद बरोबर घेऊन. त्यावर्षी रोहितने फ्रँचाईजीसाठी ५३८ धावाही केल्या होत्या. त्यानंतर संघाच्या ५ विजेतेपदांमध्ये तो संघाबरोबर आहे. २०२४ पर्यंत तो कर्णधारही होता. २५७ सामन्यांत त्याने ६,६२८ धावा केल्या आहेत. यात २ शतकं आणि ४३ अर्धशतकांचा समावेश आहे. (Mumbai Indians Players)
हरभजन सिंग
मुंबई इंडियन्ससाठी १० हंगाम खेळलेला हा ज्येष्ठ खेळाडू तीन वेळा विजेतेपदांचा साक्षीदार ठरला आहे. आणि १६३ सामन्यांमध्ये त्याने १५० बळी मिळवले आहेत. त्याची धावगतीही ७.०८ अशी मजबूत आहे. तर डावांत ५ बळी घेण्याची कामगिरी त्याने एकदा केली आहे. त्याचा स्ट्राईकरेटही २२ धावांचा आहे. (Mumbai Indians Players)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community