Mumbai Indians Sign Malinga : लसिथ मलिंगा मुंबई इंडियन्सचा नवा गोलंदाजी प्रशिक्षक

Mumbai Indians Sign Malinga : माजी भेदक तेज गोलंदाज श्रीलंकन लसिथ मलिंगा नवीन हंगामापासून मुंबई इंडियन्स संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक असेल. त्याने शेन बाँडची जागा घेतली आहे

115
Mumbai Indians Sign Malinga : लसिथ मलिंगा मुंबई इंडियन्सचा नवा गोलंदाजी प्रशिक्षक
Mumbai Indians Sign Malinga : लसिथ मलिंगा मुंबई इंडियन्सचा नवा गोलंदाजी प्रशिक्षक

ऋजुता लुकतुके

मुंबई इंडियन्स या आयपीएल संघाने नवीन हंगामासाठी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून श्रीलंकन माजी क्रिकेटपटू लसिथ मलिंगाला करारबद्ध केलं आहे. (Mumbai Indians Sign Malinga) मलिंगाने किवी तेज गोलंदाज शेन बाँडची जागा आता घेतली आहे. पुढील हंगामात मलिंगा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स संघाबरोबर दिसेल. यापूर्वी तो गोलंदाज म्हणून संघाबरोबर होता. आणि मुंबईसाठी त्याने प्रमुख गोलंदाज म्हणून भूमिका पार पाडली आहे.

प्रशिक्षक म्हणून तो मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर आणि फलंदाजीचा प्रशिक्षक कायरन पोलार्ड यांच्याबरोबर काम करेल. मुंबई इंडियन्स फ्रँचाईजींच्या न्यूयॉर्क आणि केप टाऊन येथील संघांचा गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगाच होता. आणि मेजर लीग क्रिकेट तसंच आफ्रिकन लीगमध्ये त्या संघांसाठी मलिंगाने चांगलं योगदान दिलं आहे. त्यामुळे मुंबईतही हा बदल अपेक्षितच होता. (Mumbai Indians Sign Malinga)

(हेही वाचा – Chhatrapati Shivaji Maharaj Statue : शिवकालीन गडकिल्ल्यांचे ‘फोर्ट सर्किट’ तयार करा; राज्यपालांची सूचना)

‘एमआय न्यूयॉर्क आणि एमआय केपटाऊन या संघांबरोबर मी आहेच. आता मुंबई इंडियन्सबरोबरचा माझा प्रवास आणखी विस्तारतोय याचा मला आनंद आहे. माझी निवड त्यांनी केली हा मी माझा बहुमान समजतो. आता तिथली प्रशिक्षकांची फळी आणि रोहीतच्या नेतृत्वाखालील संघ यांच्याबरोबर पुन्हा काम करायला मी उत्सुक आहे,’ असं मलिंगाने या निवडीनंतर म्हटलं आहे.

मलिंगा साधारण १३ वर्षांपासून मुंबई इंडियन्स संघाबरोबर आहे. यात ११ वर्ष संघाचा मुख्य गोलंदाज म्हणून तो संघाबरोबर होता. त्यानंतर २०१८ मध्ये तो गोलंदाजीचा मेंटॉर होता. तर २०२३ मध्ये तो एमआय न्यूयॉर्क संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून रुजू झाला. मुंबई इंडियन्स संघासाठी त्याने ७ स्पर्धा जिंकल्या आहेत. (Mumbai Indians Sign Malinga)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.