भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यासाठी लखनौहून मुंबईत आला तेव्हा कर्णधार रोहीत शर्माने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी टाकली होती. यात मुंबईवर पसरलेलं घनदाट धुरकं दिसत होतं. विमानातून काढलेल्या या फोटोला रोहीतने कॅप्शन दिली होती की, ‘मुंबईला हे झालंय काय?’ आधी फोटोच्या माध्यमातून आणि आता जाहीरपणे रोहित शर्माने मुंबईतील प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.( Mumbai Pollution)
त्या फोटोनंतर आता उघडपणे रोहीतने प्रदूषणाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.आपल्या मुलांना आपण काय देणार आहोत, या शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत रोहीतला हा प्रश्न विचारण्यात आला. आणि त्यानेही स्पष्ट उत्तर दिलं. ‘पालक म्हणून आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता वाढवणारं ते दृश्य होतं. आपण आपल्या पुढील पिढ्यांची काळजी घेतली पाहिजे. आणि मुंबईतलं हे वातावरण, हवेतील प्रदूषण मुलांसाठी चांगलं नाही,’ असं रोहीतने बोलून दाखवलं. प्रशासन याविषयी नक्कीच काळजी घेत असणार असं म्हणायलाही तो विसरला नाही. पण, त्याचवेळी मुलांचं संगोपन काळजीमुक्त वातावरणात झालं पाहिजे, असे विचार त्याने मांडले. त्याचवेळी या वातावरणात क्रिकेट खेळायला आम्ही तयार आहोत. आणि जी परिस्थिती असेल तसे आम्ही खेळू असंही त्याने स्पष्ट केलं.
(हेही वाचा : Education Secretary : राज्याच्या शिक्षण सचिवांच्या नावे अटक वॉरंट)
श्रीलंकन संघानेही खेळण्याची तयारी दाखवली आहे. पण, मुंबईत वाढती बांधकामं. सणाच्या दिवसांत वाजवले जाणारे फटाके आणि वाहनांमुळे होणारं प्रदूषण याचा परिणाम म्हणून सध्या धूळ खूप जास्त वाढली आहे. ६० टक्के जागांवर मेट्रो किंवा अगदी इमारतींचं बांधकामही सुरू आहे. आणि परिणामी मुंबईतील हवेच्या शुद्धतेची पातळी घसरत चालली असल्याचेही रोहित म्हणाला
Join Our WhatsApp Community