-
ऋजुता लुकतुके
रणजी सामन्याच्या दुसऱ्या टप्प्यात गतविजेत्या मुंबईचा जम्मू व काश्मीर संघाने ५ गडी राखून अनपेक्षितपणे पराभव केला. हा पराभव तर धक्कादायक होताच. शिवाय मुंबईचं बाद फेरीचं गणितही त्यामुळे बिघडलं आहे. मुंबईचा शेवटचा साखळी सामना मेघालयाबरोबर ३० जानेवारीपासून रंगणार आहे. आणि बोनस गुणासह हा सामना जिंकला तरीही मुंबईला इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार आहे. (Mumbai Ranji Trophy Chances)
(हेही वाचा- Maharashtra Politic : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची सह्याद्रीवर महत्त्वाची बैठक; ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होणार)
अशावेळी मुंबईच्या रणजी बाद फेरी गाठण्याच्या आशा नेमक्या काय आहेत ते पाहूया, (Mumbai Ranji Trophy Chances)
मुंबईचा जम्मू व काश्मीरकडून पराभव होत असतानाच महाराष्ट्राने बडोद्याचा ४३९ धावांनी पराभव केला. महाराष्ट्राने मिळवलेल्या या मोठ्या विजयामुळेच मुंबईच्या बाद फेरीच्या आशा काहीशा जीवंत राहिल्या आहेत. आता शेवटच्या फेरीत बडोद्याचा संघ जम्मू व काश्मीरशी खेळेल, तर मुंबईचा मुकाबला प्लेट गटातून आलेल्या मेघालयाशी आहे. ए गटात जम्मू व काश्मीरचा संघ २९ गुणांसह सध्या अव्वल आहे. तर तर बडोद्याचे २७ गुण आहेत. तर मुंबई संघाचे आहेत २२ गुण. (Mumbai Ranji Trophy Chances)
(हेही वाचा- GBS चा पहिला बळी, धायरीतील तरुणाचा सोलापुरात मृत्यू)
शेवटच्या साखळी सामन्यात मेघालयाशी मुकाबला असल्यामुळे मुंबई बोनस गुणासह ७ गुणांची कमाई करू शकेल. आणि ते धरले तर मुंबईचे होतील २९ गुण. अशावेळी बडोदा विरुद्ध जम्मू व काश्मीर दरम्यानच्या सामना मुंबईचं भवितव्य ठरवणारा असेल. बडोद्याने पहिल्या डावांतील आघाडी घेतली आणि सामना अनिर्णित झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी ३ गुण मिळतील. आणि मुंबईचं आव्हान संपुष्टात येईल. कारण, जम्मू व काश्मीर आणि बडोदा हे दोन संघ बाद फेरीत पोहोचतील. (Mumbai Ranji Trophy Chances)
पण, बडोद्याने हा सामना गमावला आणि मुंबईने आपला जिंकला तर मुंबईला बाद फेरीत पोहोचता येईल. आणखी एक शक्यता म्हणजे बडोद्याने विजयाचे पूर्ण ६ गुण वसूल केले तर जम्मू व काश्मीर आणि मुंबईचे संघ समसमान २९ गुणांवर राहतील. आणि अशावेळी गुण सरासरी विचारात घेतली जाईल. त्यामुळे मुंबईला मेघालयाविरुद्ध मोठा विजय मिळवावाच लागेल. (Mumbai Ranji Trophy Chances)
(हेही वाचा- Tilak Verma : तिलक वर्माच्या नाबाद ३१४ धावा, टी-२० मध्ये नाबाद राहण्याचा विक्रम)
आधीच्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही रोहित शर्मा, यशस्वी जयसवाल आणि श्रेयस अय्यर हे स्टार खेळाडू मुंबईकडून खेळणार आहेत. आणि त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. (Mumbai Ranji Trophy Chances)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community