देशातील सर्वोत्तम डावखुऱ्या फिरकीपटूंपैकी एक पद्माकर शिवलकर (Padmakar Shivalkar ) यांचे दि. ०३ मार्च रोजी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते आणि दि. ३ मार्चला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिवलकर यांनी देशाच्या राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळाली नाही. निवृत्ती घेतल्यानंतर शिवलकर (Padmakar Shivalkar ) यांनी मुंबई रणजी ट्रॉफी (Mumbai Ranji Trophy) संघाचे प्रशिक्षक म्हणून देखील काम केले.
( हेही वाचा : Aurangzeb चे सोशल मीडिया पोस्टद्वारे लांगूलचालन करणाऱ्या धर्मांध सेल्समनला अटक)
भारतीय संघात बेदी, प्रसन्ना आणि चंद्रशेखर यांची सद्दी असताना शिवलकर उदयाला आले. त्यामुळे दुर्दैवाने त्यांना भारतीय संघात संधी मिळाली नाही. पण, डावखुरे फिरकीपटू म्हणून त्यांनी देशांतर्गत हंगाम गाजवला. आणि मुंबईला रणजी करंडक जिंकून देण्यात वेळोवेळी महत्त्वाची भूमिका बजावली. १९६१-६२ च्या हंगामापासून ते १९८७-८८ च्या हंगामापर्यत शिवलकर मुंबईकडून खेळले. आणि यात १२४ कसोटींत त्यांनी तब्बल ५८९ बळी मिळवले.
महत्त्वाचं म्हणजे यात त्यांची सरासरी १९.६९ इतकी कमी होती. आणि डावांत १६ धावांत ८ बळी ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती. पॅडी शिवलकर नावाने ते लोकप्रिय होते. आणि २२ व्या वर्षी मुंबईकडून पदार्पण केल्यानंतर त्यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये ११ वेळा सामन्यांत १० बळी मिळवले. १९८८ मध्ये त्यांच्या वयाच्या ४८ व्या वर्षी मुंबई संघ प्रशासनाने त्यांना बाद फेरीच्या दोन कसोटी खेळण्यासाठी निवृत्तीतून परत बोलावलं होतं.
Really sad to hear about the demise of Paddy Shivalkar. A wonderful, kind hearted man, a terrific bowler and a big inspiration in the early days of my career. Condolences to the family and God bless his soul 🙏
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) March 3, 2025
‘मनाने उदार आणि दयाळू. गोलंदाज म्हणून भेदक असा पॅडी शिवलकर होता. माझ्या कारकीर्दीच्या सुरुवातीला मी त्याच्याकडून खूप काही शिकलो,’ असं रवी शास्त्रीने ट्विटमध्ये म्हटलं आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनीही शिवलकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘शिवलकर सरांच्या निधनामुळे मुंबई क्रिकेटचं न भरून निघणारं नुकसान झालं आहे. त्यांचं समर्पण, कौशल्य आणि मुंबई क्रिकेटवरील प्रभाव कधीही न विसरता येण्यासारखा आहे,’ असं नाईक यांनी म्हटलं आहे.
Padmalkar Shivalkar sir was definitely one of the greatest cricketers who should’ve played for India. Nonetheless he’s still the legend of the game. Rest in peace, sir, your contribution to the game of cricket is huge. Thoughts and prayers 🙏 pic.twitter.com/DPlzRA091z
— Dodda Ganesh | ದೊಡ್ಡ ಗಣೇಶ್ (@doddaganesha) March 3, 2025
मुंबईकडून त्यांची सर्वोत्तम कामगिरी मद्रासविरुद्ध नोंदवली होती. त्या सामन्यांत त्यांनी ३६ धावांत १४ बळी घेतले होते. शिवलकर एका हंगामात इंग्लंडच्या डरहॅम काऊंटीकडूनही खेळले होते. गेल्याच महिन्यात मुंबई क्रिकेटचा आणखी एक खंदा खांब मिलिंद रेगे यांचाही मृत्यू झाला होता. त्यानंतर एका महिन्याच्या आत मुंबई क्रिकेटने आणखी एक खेळाडू गमावला आहे.
सीसीआय क्लबकडून त्यांनी एका ऑस्ट्रेलिया दौरा केला होता. तर भारतीय ज्येष्ठ संघाकडून ते दक्षिण आफ्रिकेतही गेले होते. २०१७ साली बीसीसीआयने त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवलं होतं. मुंबई संघातील शिवकरांचे साथीदार रवी शास्त्री यांनी सर्वप्रथम ट्विटरवर शिवलकर यांना आदरांजली वाहिली.
१९६० आणि ७०च्या दशकात जेव्हा मुंबईचा देशांतर्गत क्रिकेटमध्ये दबदबा होता तेव्हा शिवलकर यांचे नाव मोठे होते. २०१७ मध्ये शिवलकर यांना बीसीसीआय सीके नायूडू जीवन गौरव पुरस्काराने (BCCI CK Nayudu Lifetime Achievement Award) सन्मानित करण्यात आले होते. खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर शिवलकर यांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथे प्रशिक्षक म्हणून काम सुरू केले. येथे त्यांनी अनेक प्रतिभावान खेळाडूंना घडवले. जसे की हरमीत सिंग (Harmeet Singh) जो अंडर १९ आणि मुंबईसाठी खेळला आणि पुढे यूएसए संघात सहभागी झाला.
१३ वेळा एका सामन्यात दहा विकेट घेण्याची कामगिरी
तीन दशके मुंबईकडून (Mumbai) खेळलेल्या शिवलकर (Padmakar Shivalkar) यांनी १२४ प्रथम श्रेणी आणि १२ प्रथम श्रेणी ‘अ’ सामन्यांत आपला दबदबा राखला होता. त्यांनी एकूण ६०५ (रणजी स्पर्धेत ५८९) फलंदाज बाद केले. या स्पर्धेत त्यांनी तब्बल ४२ वेळा निम्मा संघ तंबूत धाडला होता. एका सामन्यात दहा विकेट घेण्याची कामगिरी त्यांनी १३ वेळा केली. १९६१-६२ च्या मोसमात पहिला रणजी सामना खेळलेले शिवलकर १९८७-८८ मध्ये अखेरचा प्रथम श्रेणी सामना खेळले, त्या वेळी ते ४७ वर्षांचे होते. (Padmakar Shivalkar )
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community