ऋजुता लुकतुके
भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या विजय हजारे एकदिवसीय चषक सामने सुरू आहेत. अ गटातील एका महत्त्वाच्या सामन्यात रविवारी नवख्या त्रिपुरा संघाने मुंबईला ५३ धावांनी धूळ चारली. अ गटातील पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात दुसरी फलंदाजी करताना मुंबईचा डाव चांगल्या सुरुवातीनंतर धसरला.
(हेही वाचा-Alandi : देवस्थानच्या विश्वस्त पदावरून स्थानिकांना डावल्याने आळंदी बंद)
त्रिपुरा संघाने या सामन्यात पहिली फलंदाजी करत ५ गडी बाद २८८ अशी मजबूत धावसंख्या उभारली. त्यानंतर पाऊस झाल्यामुळे मुंबईसमोर ४३ षटकांत २६५ असं सुधारित लक्ष्य ठेवण्यात आलं. पण, मुंबईचा संघ ४१व्या षटकांत २१२ धावा करून बाद झाली.
Insert tweet –
Tripura Won by 53 Run(s) (VJD Method) #MUMvTPA #VijayHazareTrophy Scorecard:https://t.co/zT7EDebCOi
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 3, 2023
मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने ८४ चेंडूंत ७८ धावा केल्या. पण, त्रिपुराच्या गोलंदाजांसमोर तो फारसा मोकळेपणाने खेळताना दिसला नाही. इतर फलंदाज तर खेळपट्टीवर टिकूही शकले नाहीत. त्यामुळे त्रिपुराचा विजय शक्य झाला. त्रिपुराने यापूर्वी गतविजेत्या सौराष्ट्रालाही धक्का दिला होता.
मणीशंकर मुरासिंगने २५ धावांत ४ बळी टिपले. मणीशंकरची कामगिरी अष्टपैलू ठरली. त्याने तळाला येऊन घणाघाती अर्धशतकंही ठोकलं. त्यामुळे तोच सामनावीर किताबाचा मानकरी ठरला.
मुंबईचा रविवारी पराभव झाला असला तरी या स्पर्धेत आतापर्यंत ६ सामने जिंकून संघाने २० गुण मिळवले आहेत. त्यामुळे गटात संघ अव्वल आहेच. आणि स्पर्धेच्या उपउपान्त्य फेरीत संघाचा प्रवेशही निश्चित आहे. मुंबईचा आणखी एक साखळी सामना बाकी आहे.
(हेही पहा-https://www.youtube.com/watch?v=piFAyD8oABQ)
Join Our WhatsApp Community