Mushtaq Ali T20 : दुखापतीतून सावरलेले सूर्यकुमार यादव, शिवम दुबे मुंबईकडून खेळण्यासाठी सिद्ध

Mushtaq Ali T20 : मुंबईचे २ साखळी सामने बाकी आहेत.

87
Mushtaq Ali T20 : दुखापतीतून सावरलेले सूर्यकुमार यादव, शिवम दुबे मुंबईकडून खेळण्यासाठी सिद्ध
Mushtaq Ali T20 : दुखापतीतून सावरलेले सूर्यकुमार यादव, शिवम दुबे मुंबईकडून खेळण्यासाठी सिद्ध
  • ऋजुता लुकतुके

सय्यद मुश्ताक अली टी-२० (Mushtaq Ali T20) स्पर्धेत मुंबईचं आव्हान सध्या डळमळीत आहे. पण, उर्वरित दोन सामन्यांसाठी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि शिवम दुबे (Shivam Dube) हे दोन खेळाडू संघात परतणार आहेत, ही जमेची बाजू आहे. मुंबईचे दोन साखळी सामने आता बाकी आहेत. पैकी ३ तारखेला सेवा दलाशी तर ६ डिसेंबरला आंध्रप्रदेश विरुद्धचा सामना होणार आहे. मुंबईला अजूनही बाद फेरीची आशा आहे. पण, त्यासाठी उर्वरित सामने जिंकावे लागणार आहेत.

शिवम दुबे (Shivam Dube) हा डावखुरा धडाकेबाज फलंदाज सप्टेंबर महिन्यापासून पाठदुखीमुळे खेळू शकलेला नाही. या कालावधीतील आंतरराष्ट्रीय मालिकांनाही तो मुकला. पण, आता तो दुखापतीतून सावरला असून हैद्राबादमध्ये असलेल्या संघात तो शामील होणार आहे. तर सूर्यकुमारच्या घरी त्याच्या सख्ख्या बहिणीचं लग्न होतं. त्यामुळे सुरुवातीचे सामने तो खेळू शकलेला नाही.

(हेही वाचा – लॅण्ड जिहाद, लव्ह जिहाद विरोधात हिंदूंनी एकत्र या; भाजपा नेते T.Raja Singh यांचे आवाहन)

शिवम दुबेसाठीही (Shivam Dube) ही महत्त्वाची संधी आहे. कारण, टी-२० संघात सध्या मधल्या फळीत जोरदार चुरस आहे. आणि मुश्ताक अली स्पर्धेत (Mushtaq Ali T20) चांगली कामगिरी करून पुन्हा एकदा भारतीय संघात परतण्याचा प्रयत्न तो करू शकेल. जानेवारी महिन्यात भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध ५ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे. या मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन करण्याचा दुबेचा प्रयत्न असेल.

अलीकडेच चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) त्याला १२ कोटी रुपये देऊन आपल्याकडे कायम ठेवलं आहे. सय्यद मुश्ताक स्पर्धेत (Mushtaq Ali T20) मुंबईचा संघ एकूण ३ सामने खेळला आहे. आणि यातील २ सामने त्यांनी जिंकले आहेत तर एक गमावला आहे. ८ गुणांसह ते चौथ्या क्रमांकावर आहेत. रविवारी मुंबईने नागालँडचा पराभव केला आहे. आता साखळीत आणखी २ सामने बाकी आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.