- ऋजुता लुकतुके
क्रिकेटमधील सगळ्यात गंभीर अपघातांपैकी एक डोक्यावर मार बसणे. आणि बांगलादेशचा फलंदाज मुस्तफिझुरला रविवारी अशाच अनुभवाला सामोरं जावं लागलं. बांगलादेश प्रिमिअर लीग दरम्यान सराव करताना मुस्तफिझुरच्या डोक्यावर जखम झाली. झहुर अहमद चौधरी स्टेडिअमवर कॉमिला व्हिक्टोरियन संघाच्या सरावादरम्यान हा प्रसंग घडला.
मुस्तफिझुर यष्ट्यांजवळ उभा असताना चेंडू थेट त्याच्या डोक्यावर बसला. आणि त्या आवेगामुळे तो डाव्या बाजूला कोसळला. ‘सराव करत असताना कुठूनसा चेंडू आला आणि तो मुस्तिफिझूरच्या डोक्यावर डाव्या बाजूला बसला. रक्तस्त्रावही होत होता. तो मैदानावर कोसळला असला तरी सावध होता. आम्ही रक्त थांबवण्यासाठी बँडेज बांधलं आणि मग त्याला चित्तोग्रामच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, तिथे स्कॅन केले असता ही जखम फक्त बाहेरून असल्याचं स्पष्ट झालं आहे,’ असं संघाचे फिजिओ झहिदुल इस्लाम यांनी सांगितलं.
(हेही वाचा – IPL All Time Great Team : आयपीएलच्या सर्वकालीन सर्वोत्तम संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी)
HEAD INJURY.
Mustafizur Rahman taken to hospital after blow to head.
The fast bowler was struck on the head by a shot played by Litton Das during a Comilla Victorians practice session.#batbricks7 #news #bangladesh pic.twitter.com/d9KJaQRsvM— BatBricks7 (@Batbricks7) February 18, 2024
कॉमिला संघाचे मीडिया व्यवस्थापक सोहनुझम्मान खान यांनीही मुस्तफिझूरची तब्येत ठिक असल्याचा निर्वाळा दिला आहे. २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियन सलामीवीर फिल ह्युजेसचा डोक्यावर चेंडू लागून मृत्यू झाला होता. तर २०२२ च्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय महिला खेळाडू स्मृती मंढाणाला कानाच्या वर जोरदार मार बसला होता. क्रिकेटमध्ये डोक्याला मार बसणे आणि खेळाडूंची टक्कर होणं या गंभीर दुखापती आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community