NADA India : डोपिंग विरोधात जनजागृती करण्यासाठी क्रीडाप्रेमींचा सहभाग

#PlayTrue मोहिमेत सहभागींना खेळांमध्ये डोपिंगचे परिणाम जाणून घेण्याची, पूरक आहार समजून घेण्याची आणि डोपिंगविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीची भूमिका जाणून घेण्याची संधी मिळाली.

144
NADA India : डोपिंग विरोधात जनजागृती करण्यासाठी क्रीडाप्रेमींचा सहभाग

भारतातील नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सी (NADA), #PlayTrue या मोहिमेचा समारोप केला. या मोहिमेमध्ये १२,१३३ हून अधिक लोकांनी सहभाग घेतला. या मोहिमेने वाडा अर्थात जागतिक अँटी-डोपिंग एजन्सी प्ले ट्रू डे या मोहिमेचे अनुसरण केले आणि भारतातील स्वच्छ खेळाचे महत्त्व आणि डोपिंग विरोधी पद्धतींबद्दल जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने, देशभरातील क्रीडापटू, प्रशिक्षक आणि क्रीडा प्रेमींचा जबरदस्त सहभाग आणि पाठिंबा या मोहिमेला मिळाला. (NADA India)

नाडाची #PlayTrue मोहीम भारतातील खेळाडू, प्रशिक्षक आणि संपूर्ण क्रीडा समुदायाला डोपिंग विरोधी नियमांची सखोल माहिती देऊन, त्यांना भारतात डोपिंगविरहित स्वच्छ खेळाचा पुरस्कार करण्यासाठी सक्षम बनवण्याच्या वचनबद्धतेला अधोरेखित करते. ही मोहीम १५ ते ३० एप्रिल २०२४ दरम्यान आयोजित करण्यात आली होती. (NADA India)

वर्ल्ड अँटी-डोपिंग एजन्सी (WADA) च्या दृष्टीकोनाशी संरेखित, #PlayTrue मोहीम निष्पक्ष खेळ, डोपिंग नाकारणे आणि निष्पक्ष स्पर्धेच्या भावनेला प्रोत्साहन देऊन खेळांमध्ये अखंडता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करते. #PlayTrue प्रश्नमंजुषा, मी #PlayTrue ॲम्बेसेडर, #PlayTrue प्रतिज्ञा आणि (शुभंकर) रेखाचित्र स्पर्धा यासह त्याच्या परस्परसंवादी उपक्रमांद्वारे नाडा इंडियाने सहभागींना गुंतवून त्याद्वारे स्वच्छ आणि नैतिक स्पर्धेची संस्कृती वाढवण्याचे प्रयत्न केले.  (NADA India)

(हेही वाचा – Police Constable च्या मृत्यू मागील गूढ वाढले; मृत्यूपूर्वी दिलेली जबानी आणि प्रत्यक्ष तपासात उघड झालेल्या माहितीत तफावत)

या मोहिमेत डोपिंगविरोधी नियमांच्या सर्व पैलूंचा अंतर्भाव करणारी अंतर्दृष्टीपूर्ण जागरुकता निर्माण करणारी सत्रे होती. सहभागींना खेळांमध्ये डोपिंगचे परिणाम जाणून घेण्याची, पूरक आहार समजून घेण्याची आणि डोपिंगविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीची भूमिका जाणून घेण्याची संधी मिळाली. भारताच्या क्रीडा समुदायातील प्रत्येक विभागापर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात, क्रीडा परिसंस्थेमध्ये सर्वसमावेशक कव्हरेज सुनिश्चित करून, क्रीडापटू, वैद्यकीय व्यावसायिक, शिक्षक, कायदेशीर व्यक्ती आणि पौष्टिक पूरक उत्पादक यांच्यासाठी सत्रे तयार केली गेली. (NADA India)

पॅरिस २०२४ ऑलिम्पिकच्या अपेक्षेने एक लवचिक डोपिंग विरोधी नियमावली तयार करण्याच्या दिशेने सहयोग, अंतर्दृष्टी आणि धोरणांची देवाणघेवाण करण्यासाठी या मोहिमेने खेळाडू आणि भागधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम म्हणून काम केले. जागतिक मंचावर निष्पक्ष खेळ, सचोटी आणि स्वच्छ खेळाच्या तत्त्वांचे समर्थन करण्यासाठी भारताची अटल वचनबद्धता या संपूर्ण कार्यक्रमात ठळकपणे दिसून आली. (NADA India)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.