-
ऋजुता लुकतुके
पुढील वर्षी वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या वर्ल्ड टी-२० स्पर्धेसाठी नामिबियाचा संघ पात्र ठरला आहे. (World T20 2024)
नामिबिया क्रिकेट संघ वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड टी-२० स्पर्धेसाठी आफ्रिकन खंडातून पात्र होणारा पहिला संघ ठरला आहे. पात्रता स्पर्धेत संपूर्ण वर्चस्व गाजवताना त्यांनी पाचही सामन्यात मोठे विजय मिळवले. शेवटच्या सामन्यांत मंगळवारी त्यांनी टांझानियाचा ५८ धावांनी पराभव केला. (World T20 2024)
विशेष म्हणजे केनिया आणि झिंबाब्वे सारख्या एकदिवसीय क्रिकेट खेळलेल्या संघांच्या गटात समावेश असतानाही नामिबियाने या बलाढ्य संघांना मागे टाकून गटात अव्वल क्रमांक पटकावला आहे. झिंबाब्वेचा संघ एकदिवसीय विश्वचषकापाठोपाठ टी-२० मधूनही बाद होण्याच्या वाटेवर आहे. उलट नामिबियाने पात्रता फेरीत झिंबाब्वे आणि केनिया बरोबरच रवांडा, युगांडा आणि नायजेरिया यांच्यावरही निर्विवाद विजय मिळवला. (World T20 2024)
𝑸𝑼𝑨𝑳𝑰𝑭𝑰𝑬𝑫 👍
Namibia have booked their berth for Men’s #T20WorldCup 2024 👏https://t.co/2VxDgDrCWJ
— ICC (@ICC) November 28, 2023
(हेही वाचा – Winter Session : हिवाळी अधिवेशनाच्या निर्णयाबाबत कामकाज सल्लागार समितीची बैठक)
नामिबियाने सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड टी-२० मुख्य स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. २०२१ मध्ये त्यांनी सुपर १२ संघांत प्रवेश मिळवला होता. नामिबियाकडून झेन ग्रीन, निकोल लॉफ्टी एटन आणि जे स्मिट हे फलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. (World T20 2024)
आफ्रिका खंडातून आता नामिबियाचा मुख्य स्पर्धेतील प्रवेश निश्चित झाला आहे. तर केनिया आणि युगांडा या संघांना पात्रतेसाठी आपले उर्वरित सामने जिंकावेच लागणार आहेत. झिंबाब्वे आणि रवांडा संघाचं भवितव्य गटातील इतर निकालांवर अवलंबून आहे. (World T20 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community