-
ऋजुता लुकतुके
भारताच्या पुरुष व महिला संघांनी अनुक्रमे खुल्या व महिला गटात बुद्धिबळ ऑलिम्पियाचं विजेतेपद पटकावलं. तब्बल ९७ वर्षांत पहिल्यांदा ही किमया भारतीय संघांनी केली. अगदी विश्वनाथन आनंद पूर्ण भरात होता, तेव्हाही भारतीय संघाला पदक जिंकणं शक्य झालं नव्हतं. या पराक्रमानंतर भारतीय संघ भारतात परतला तेव्हापासून खेळाडूंचे सत्कार समारंभ सुरूच आहेत. त्यातलीच एक अविस्मरणीय भेट होती ती दोन्ही संघांची नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींशी झालेली भेट. या भेटीचे फोटो आता समाज माध्यमांसमोर आले आहेत. त्यामुळे या भेटीत काय घडलं याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. (Narendra Modi Meet Olympiad Teams)
(हेही वाचा- ST Bus अस्वच्छ अनेक बसेसमध्ये पान, गुटखाच्या पिचकाऱ्या, प्रवाशांना मनस्ताप)
पंतप्रधान मोदींची भेट घेणाऱ्या खेळाडूंमध्ये महिला संघातील डी हरिका (D Harika), वैशाली रमेशबाबू (Vaishali Rameshbabu), दिव्या देशमुख (Divya Deshmukh), तानिया सचदेवा (Tania Sachdev) आणि वंतिका अग्रवाल (Vantika Agrawal) यांचा समावेश होता. तर पुरुष संघातून डी. गुकेश (D. Gukesh), आर. प्रज्ञानंद (R. Praggnanandhaa), अर्जुन एरिगेसी (Arjun Erigaisi), विदित गुजराती (Vidit Gujrathi) आणि हरिकृष्ण पंताला (Harikrishna Panta) पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी पोहोचले. (Narendra Modi Meet Olympiad Teams)
PM Modi meets and congratulates Chess Olympiad winning team at his residence
Read @ANI Story | https://t.co/y4RMVoVzry #PMModi #ChessOlympiad #FIDE #InternationalChessFederation pic.twitter.com/siRIptBbjo
— ANI Digital (@ani_digital) September 25, 2024
पंतप्रधानांन स्वत: बुद्धिबळ खेळले नाहीत. पण, त्यांनी प्रग्यानंदा आणि अर्जुन एरिगसी यांना एक डाव खेळायला लावला. आणि ते हा सामना निरखून पाहत होते. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी पंतप्रधानांना बुद्धिबळाचा एक पट भेट म्हणून दिला. (Narendra Modi Meet Olympiad Teams)
Wonderful scenes as Prime Minister Narendra Modi meets the Chess Olympiad Champions!👏
Rameshbabu Praggnanandhaa and Arjun Erigaisi also explained the fundamentals of Chess and played a fun game!🇮🇳#Chess #SKIndianSports pic.twitter.com/SmjZ9rJKtA
— Sportskeeda (@Sportskeeda) September 25, 2024
खुल्या गटात भारताने १०व्या फेरीनंतरच पहिले स्थान निश्चित केले होते, मात्र ११व्या फेरीनंतर महिला संघाचे सुवर्णपदक निश्चित झाले. कारण दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कझाकिस्तान संघाने अमेरिकेविरुद्ध २-२ अशी बरोबरी साधली होती. यामुळे भारत १९ गुणांसह पहिल्या तर कझाकिस्तान १८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. बुडापेस्ट, हंगेरी येथे १० सप्टेंबरपासून चेस ऑलिम्पियाडचे आयोजन करण्यात आले होते. (Narendra Modi Meet Olympiad Teams)
(हेही वाचा- उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर अज्ञात महिलेकडून तोडफोड!)
शेवटच्या फेरीत भारताकडून गुकेश डोमराजू, आर प्रज्ञानंद आणि अर्जुन इरिगेसी यांनी आपापले सामने जिंकले. तर विदित संतोष गुजराथीने ड्रॉ खेळून संघाची धावसंख्या ३.५ वर नेली. भारताने ११वी फेरी जिंकली आणि एकूण २१ गुण मिळवले. तर चीन आणि अमेरिका प्रत्येकी १६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. (Narendra Modi Meet Olympiad Teams)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community