राष्ट्रीय अजिंक्यपद Sport Climbing स्पर्धेत पुण्याच्या खेळाडूंनी मिळवले घवघवीत यश

86
राष्ट्रीय अजिंक्यपद Sport Climbing स्पर्धेत पुण्याच्या खेळाडूंनी मिळवले घवघवीत यश
राष्ट्रीय अजिंक्यपद Sport Climbing स्पर्धेत पुण्याच्या खेळाडूंनी मिळवले घवघवीत यश

राष्ट्रीय अजिंक्यपद स्पोर्ट क्लाइंबिंग स्पर्धा २०२५ मध्ये (Sport Climbing) पुण्यातील अनेक खेळाडूंनी मोठे यश मिळवले आहे. बेंगळुरू येथे दि. १७ ते २० जानेवारी २०२५ या कालावधी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पोर्ट क्लाइंबिंग स्पर्धा २०२५ या स्पर्धेचे भारतीय पर्वतारोहण संस्थान (Indian Mountaineering Foundation) आणि जनरल थिमय्या नॅशनल अडवेंचर अकॅडमीच्या (General Thimayya National Adventure Academy) साहाय्याने आयोजन करण्यात आले होते. भारतीय पर्वतारोहण संस्थान ही पर्वतारोहण क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च संस्था आहे. अनेक खेळाडूंना प्रोत्सहन देण्यासाठी ही संस्था कार्य करत असल्याची माहिती ही भारतीय पर्वतारोहण संस्थान, पश्चिम विभाग समितीचे, सचिव श्रीकृष्ण कडुसकर (Srikrishna Kaduskar) यांनी दिली. (Sport Climbing)

( हेही वाचा : उत्पन्न वाढीसाठी अर्थसंकल्पात महत्त्वपूर्ण निर्णय घेणार; उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांची माहिती

राष्ट्रीय अजिंक्यपद स्पोर्ट क्लाइंबिंग स्पर्धा एकूण तीन वयोगटात आयोजित करण्यात आली होती. त्यात सब ज्युनिअर (वय वर्षे ११ ते १३) , ज्युनिअर (वय वर्षे १४ ते १६) आणि खुला गट (वय वर्षे १७ व पुढील) अशी गट रचना होती. ही स्पर्धा लीड, बोल्डर आणि स्पीड या तीन प्रकारात घेण्यात आली होती. या स्पर्धेत एकूण १४२ स्पर्धकांनी देशाच्या विविध भागातून सहभाग घेतला या स्पर्धेत पुण्याच्या खेळाडूंनी सहभागी होत उत्तम कामगिरी केली. या स्पर्धेतील पुण्यातील विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे आहेत. (Sport Climbing)

लीड क्लाइंबिंग

१. सब ज्युनिअर मुले
नील वारके – रजत पदक ( राजे शिवाजी क्लाइंबिंग वॉल)

२. सब ज्युनिअर मुली
ध्रुवी पडवळ – कास्य पदक ( राजे शिवाजी क्लाइंबिंग वॉल)

३. ज्युनिअर मुले
श्रीहान मराठे – रजत पदक (विद्या व्हॅली स्कूल)

४. ज्युनिअर मुली
अभिपशा रॉय – रजत पदक (विद्या व्हॅली स्कूल)
५. महिला खुला गट
सानिया शेख – रजत पदक ( राजे शिवाजी क्लाइंबिंग वॉल)

बोल्डर

१. सब ज्युनिअर मुले
नील वारके – रजत पदक ( राजे शिवाजी क्लाइंबिंग वॉल)

२. सब ज्युनिअर मुली
शरयू हांडे – रजत पदक ( राजे शिवाजी क्लाइंबिंग वॉल)

३. ज्युनिअर मुली
अभिपशा रॉय – कास्य पदक (विद्या व्हॅली स्कूल)

स्पीड क्लाइंबिंग

१. सब ज्युनिअर मुले
राजवर्धन शेडगे – कास्य पदक ( राजे शिवाजी क्लाइंबिंग वॉल)

2. सब ज्युनिअर मुली
शरयू हांडे – सुवर्ण पदक ( राजे शिवाजी क्लाइंबिंग वॉल)

3. ज्युनिअर मुले
श्रीहान मराठे – कास्य पदक (विद्या व्हॅली स्कूल)

4. ज्युनिअर मुली
अभिपशा रॉय – सुवर्ण पदक (विद्या व्हॅली स्कूल)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.