National Games 2023 : महाराष्ट्राचे पुरुष आणि महिला खो खो संघ अंतिम फेरीत

३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांनी अपेक्षेप्रमाणेच खो खोच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. दोन्ही संघांनी मिळवलेले विजय एकतर्फी होते. 

110
National Games 2023 : महाराष्ट्राचे पुरुष आणि महिला खो खो संघ अंतिम फेरीत
National Games 2023 : महाराष्ट्राचे पुरुष आणि महिला खो खो संघ अंतिम फेरीत
  • ऋजुता लुकतुके

३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांनी अपेक्षेप्रमाणेच खो खोच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. दोन्ही संघांनी मिळवलेले विजय एकतर्फी होते. (National Games 2023)

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत खो खोमध्ये महाराष्ट्राचे पुरुष आणि महिला संघ सुवर्ण पदकापासून फक्त एक पाऊल दूर आहेत. महाराष्ट्र पुरुष व महिला संघाने अनुक्रमे केरळ व कर्नाटकचा दणदणीत धुव्वा उडवत अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात महिलांमध्ये ओडिशाने केरळचा तर पुरुषांमध्ये ओडिसाने आंध्रप्रदेशचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. उद्या महाराष्ट्र पुरुष व महिला संघाची अंतिम लढत ओडिशाच्या दोन्ही संघांबरोबर होणार आहे. (National Games 2023)

फोंडा, गोवा येथे सुरू असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आज उपांत्य फेरीच्या सामन्यांना प्रारंभ झाला. पहिल्या सामन्यात महाराष्ट्र महिला संघाने कर्नाटकचा ५४-३० असा २४ गुणांनी मोठा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. यामुळे मध्यंतराला महाराष्ट्र कडे ३२-१४ अशी भक्कम आघाडी होती. महाराष्ट्रकडून प्रियंका इंगळेने २.३० मि. संरक्षण करत १० गुणांची कमाई केली काजल भोरने १.१० मि. संरक्षण करून ८ गुण मिळवले. प्रीती काळेने नाबाद २.२० मि. संरक्षण केले तर पूजा फरगडेने ८ गुण मिळवले. रेश्मा राठोडने नाबाद २.००, १.२० मि. संरक्षण करताना २ गुण संपादन केले. कर्नाटककडून वीणा एम.ने १.४० मि. तर मोनिकाने १.०५, १.४० मि. संरक्षण करत ४ गुण संपादन केले. (National Games 2023)

महिला गटाच्या दुसऱ्या उपांत्य सामनात ओडिशाने केरळचा ६४-३० असा एकतर्फी ३४ गुणांनी पराभव केला. केरळ संघाकडून सुथश्री सिंहने १.२० मि. संरक्षण करत आक्रमणात १० गुण मिळवले मधुमिताने १.२० मि. संरक्षण करताना आक्रमणात तब्बल २० गुणांची कमाई केली समर्था साहूने १.२० मि. संरक्षण करत आक्रमणास ६ गुण मिळवले. समारानिका साहूने ६ तर आदिथ्याने आक्रमण मध्ये ८ गुणांची कमाई केली. (National Games 2023)

पुरुषांच्या उपांत्य सामन्यात महाराष्ट्राने केरळचा ६८-२४ असा ४६ गुणांनी दणदणीत पराभव करीत अंतिम फेरीत दिमाखदार प्रवेश केला. विजेतेपदासाठी महाराष्ट्राची उद्या ओडीसाशी लढत होणार आहे. पहिल्या डावात संरक्षण करताना अपयशी ठरलेल्या लक्ष्मण गवसने दुसऱ्या गावात १.०० मि. संरक्षण करीत आक्रमणामध्ये तब्बल १६ गुणांची कमाई करत केरळचा बचाव भेदून टाकला. (National Games 2023)

(हेही वाचा – Unseasonal Rain : कोकणासह मध्य महाराष्ट्रात अवकाळी पाऊस; भातशेती संकटात)

रामजी कश्यपणे २.२० मि. संरक्षण करत आक्रमणात ६ गुणांची कमाई केली, तर सौरभ घाडगेने १.०० मि. संरक्षण करताना आक्रमणामध्ये ४ गुण मिळवले. आदित्य गणपुलेने २.२० मी. संरक्षण करून आक्रमणात २ गुण मिळवले. केरळकडून निखिलने १.०० मि. संरक्षण करत आक्रमणात २ गुण तर विसाद एस.ने १.१०० मि. संरक्षण करत आक्रमणात ४ गुण मिळवले. (National Games 2023)

पुरुष गटाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात ओडिशा संघाने आंध्रप्रदेशवर ४४-४२ असा २ गुणांनी निसटता विजय संपादन केला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात ओडिशाचा कर्णधार जगन्नाथ दासने २.४५, १.३० मि. संरक्षण करत आक्रमणात ४ गुणांची कमाई केली. अर्जुन सिंगने १.२५ मि. संरक्षण करत आक्रमणात ६ गुण मिळवले. निरंजन सामलने १.२० मि. संरक्षण करत आक्रमणात २ गुण मिळवले. आंध्र प्रदेशकडून फानिकुमराने १.३०, १.२० मि. संरक्षण करत आक्रमणात २ गुण मिळवले, तर हे प्रवीणने २.०० मि. संरक्षण करत आक्रमणात २ गुणांची कमाई केली. (National Games 2023)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.