-
ऋजुता लुकतुके
३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांनी अपेक्षेप्रमाणेच उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. दोन्ही संघांनी मिळवलेले विजय एकतर्फी होते. (National Games 2023)
गोवा इथं सुरू असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राच्या पुरुष व महिला खो-खो संघांनी गटातील तीनही सामन्यात सहज विजय मिळवत उपांत्य फेरीत दिमाखदार प्रवेश केला. आता उपांत्य सामन्यात महाराष्ट्र महिला संघाची कर्नाटकशी गाठ पडणार आहे. (National Games 2023)
फोंडा मल्टीपर्पज मैदानावर सुरू असलेल्या खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने सलग तिसऱ्या दिवशी तिसऱ्या विजयाची नोंद करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. गटातील तीनही सामने जिंकत महाराष्ट्र महिला संघाने गटात अव्वल स्थान कायम राखले. ब गटात दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या कर्नाटक बरोबर महाराष्ट्रची उपांत्य फेरीची लढत रंगणार आहे. (National Games 2023)
गटातील शेवटच्या सामन्यात महाराष्ट्राने गुजरातचा ४८-२४ असा २४ गुणांनी पराभव केला. महाराष्ट्राकडून प्रियांका भोपिने ३.४० मि. संरक्षण करत २ गुण मिळवले. पूजा फरगडेने आक्रमणाची चमक दाखवत १० गुण मिळवले. किरण शिंदेने २.३० मि. संरक्षण करत २ गुण मिळवले. संपदा मोरेने २.०० मि. संरक्षण करत ६ गुण मिळवले. गुजरात संघाकडून किरण १.२० मि आणि १.१० मि. संरक्षण केले. तर गोपीने १.३०, १.२० मि. संरक्षण करत २ गुण मिळवले. (National Games 2023)
(हेही वाचा – Sunil Narine Retired : वेस्ट इंडिजचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सुनील नारायण निवृत्त)
महिला गटात महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक आणि ओडीशा विरुद्ध केरळ असे सामने होणार आहेत. महिला गटातील अन्य सामन्यात कर्नाटकने हरियाणाचा ५२-४० असा २२ गुणांनी तर केरळने गोव्याचा १२०-१२ असा १०८ गुणांनी पराभव केला. पुरुष गटात महाराष्ट्राने शेवटच्या साखळी सामन्यात आंध्रप्रदेशवर ७४-३२ असा ४२ गुणांनी सहज विजय मिळवला असला तरी सामन्याला प्रारंभ जोशात झाला. प्रथम आक्रमण करणाऱ्या आंध्रप्रदेशने १६ गुण मिळवण्यात यश मिळवले. यामुळे सामना चुरशीचा होईल असे वाटत होते. मात्र महाराष्ट्रने धारदार आक्रमण करीत २६ गुणांची कमाई करताना सामना एकतर्फी केला. (National Games 2023)
फैजन पठाणने १.१० मि. संरक्षण करत १६ गुणांची नोंद केली, त्याला साथ देत रामजी कश्यपने १.१०, १.०५ मि. संरक्षण करताना १२ गुण मिळवले. ऋषिकेश मुरचवडेने ८ गुण मिळवले तर अक्षय मासाळने १.२० मि. संरक्षण करताना ६ गुण वसूल केले. आंध्रप्रदेशकडून पी. नरसय्याने १.०० मि. संरक्षण करीत ६ गुण मिळवले. सिवा रेड्डीने १.२० मि. संरक्षणचा खेळ करत आक्रमणात ६ गुण मिळवले. (National Games 2023)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community