-
ऋजुता लुकतुके
गोव्यात होणाऱ्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे कबड्डीचे दोन्ही संघ जाहीर झाले आहेत. ४ नोव्हेंबरपासून या स्पर्धा सुरू होत आहेत. गोव्यात येत्या ४ ते ८ नोव्हे. या कालावधीत होणाऱ्या “३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत” होणाऱ्या कबड्डी स्पर्धेकरीता महाराष्ट्राने शुक्रवारी आपले दोन्ही संघ जाहीर केले. हराजित कौर संधू हिच्याकडे महिला, किरण मगर याच्याकडे पुरुष संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली. (National Games)
पौर्णिमा जेधे महिला संघाची उपकर्णधार असेल. तर आदित्य शिंदे यांच्याकडे पुरुषांच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महिलांचा संघ राजेश पाडावे यांच्या, तर पुरुषांचा संघ दादासो आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुल येथे सराव करीत आहे. या आधीच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. यंदा जेतेपद मिळवायचेच या इराद्याने दोन्ही संघ जोरदार तयारी करीत आहेत. आज हे संघ एका पत्रकाद्वारे महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.चे सचिव बाबुराव चांदेरे यांनी सर्व प्रसार माध्यमाकरीता जाहीर केले. संघ खालील प्रमाणे. (National Games)
(हेही वाचा – MHADA : बॉम्बे डाईंग, श्रीनिवास मिलमधील ११४ गिरणी कामगार/वारसांच्या हाती घरांची चावी)
महिला संघ
१) हरजित कौर संधू (कर्णधार), पौर्णिमा जेधे(उपकर्णधार), ३)रेखा सावंत, ४)पूजा शेलार, ५)अंकिता जगताप, ६)पूजा यादव, ७)सलोनी गजमल, ८)मंदिरा कोमकर, ९)सिद्धी नाखवा, १०)हर्षदा हुंदाडे, ११)अपेक्षा टाकळे, १२)कोमल देवकर.
प्रशिक्षक :- राजेश पाडावे. (National Games)
पुरुष संघ
१)किरण मगर (कर्णधार), २)आदित्य शिंदे(उपकर्णधार), ३)राम अडागळे, ४)मयूर कदम, ५) असलम इनामदार, ६)आकाश शिंदे, ७)पंकज मोहिते, ८) आरकम शेख, ९)तेजस पाटील, १०)विशाल ताटे, ११)हर्षद लाड, १२)शंकर गदई.
प्रशिक्षक :- दादासो आव्हाड. (National Games)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community