- ऋजुता लुकतुके
यंदा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला दोन ऑलिम्पिक पदकं मिळवून देणारी मनु भाकर आणि सगळ्यात लहान वयात जगज्जेता ठरलेला डी गुकेश यांना यंदाचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामुळे यंदा हा पुरस्कार ४ खेळाडूंना देण्यात येणार आहे. यापूर्वी हॉकीपटू हरमनप्रीतसिंग आणि प्रवीण कुमार यांची नावं निश्चित झालेली होती. खेलरत्न हा देशातील सर्वोच्च मानाचा क्रीडा पुरस्कार आहे. (National Sports Awards)
मनु भाकरला पुरस्कारासाठी डावलल्यामुळे अलीकडेच मोठा वाद निर्माण झाला होता. पण, त्यानंतर पुरस्कारासाठी अर्ज भरताना आपल्याकडून तांत्रिक चूक झाल्याचं मनुने कबूल केलं आणि ती चूक सुधारत असल्याचंही तिने नंतर म्हटलं होतं. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वीच डी गुकेशने चीनच्या डिंग लिरेनला हरवून १८ वर्षं आणि १६५ दिवसांच्या वयात बुद्धिबळातील जगज्जेतेपद मिळवलं आहे. त्यामुळे या दोघांचाही या पुरस्कारासाठी विचार झाला. (National Sports Awards)
(हेही वाचा – नक्षलग्रस्त भागांच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांचे PM Narendra Modi यांच्याकडून कौतुक)
प्रेस इन्फोर्मेशन ब्युरोने गुरुवारी संध्याकाळी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची अंतिम यादी ट्विट केली आहे.
➡️ @YASMinistry announces #NationalSportsAwards 2024
➡️ President of India to give away Awards on 17th January 2025
➡️ ‘Major Dhyan Chand Khel Ratna Award’ is given for the spectacular and most outstanding performance in the field of sports by a sportsperson over the period of… pic.twitter.com/nRY3nsleOY
— PIB India (@PIB_India) January 2, 2025
मनु भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर रायफलमध्ये वैयक्तिक आणि मिश्र सांघित प्रकारात मिळून दोन कांस्य पदकांची कमाई केली होती. एकाच ऑलिम्पिकमध्ये दुहेरी पदक जिंकणारी ती पहिली भारतीय ॲथलीट ठरली आहे. तर याच ऑलिम्पिकमध्ये हॉकीपटू हरमनप्रीतने सर्वाधिक गोल नोंदवले आणि भारताला कांस्य पदक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. टोकयो आणि लागोपाठ पॅरिसच्या ऑलिम्पिकमध्ये हरमनप्रीतने संघाचं नेतृत्व करत पदक मिळवून दिलं आहे. (National Sports Awards)
पॅरा ॲथलीट प्रवीण कुमारने उंच ऊडी प्रकारात टी६४ प्रकारात सुवर्ण जिंकण्याची किमया केली होती. त्याचं पदक लक्षवेधी ठरलं होतं. खेलरत्न पुरस्कारांव्यतिरिक्त ३२ खेळाडूंना अर्जुन पुरस्कारही जाहीर झाला आहे. कुस्तीपटू अमन सेहरावत हे त्यातील गाजलेलं नाव आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये त्याने कुस्तीत कांस्य पटकावलं होतं. (National Sports Awards)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community