ऋजुता लुकतुके
आयपीएलच्या गेल्या हंगामात विराट कोहलीबरोबर मैदानावर झालेल्या भांडणामुळे (Naveen-ul-Haq Banned) वादग्रस्त ठरलेला अफगाणिस्तानचा तेज गोलंदाज नवीन उल हकवर इंटरनॅशनल लीग टी-२० मधून निलंबनाची कारवाई झाली आहे. तो २० महिने ही लीग खेळू शकणार नाही. लीगचे नियम न पाळल्याबद्दल त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. शारजा वॉरिअर्स या संघाबरोबरचा करार न पाळल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
इंटरनॅशनल लीग टी२० ही संयुक्त अरब अमिरातीतील क्रिकेट लीग आहे. लीगच्या पहिल्या वर्षी नवीन उल हक दुबई वॉरियर्स या संघाकडून खेळला. पहिल्या हंगामानंतर दुबई फ्रँचाईजींनी त्याला एक वर्षाचा करार वाढवून देण्याची तयारी दाखवली. पण, नवीनने करारावर स्वाक्षरी केली नाही.
Breaking: Naveen Ul Haq has been banned for 20 months from participation in International League T20 due to breach of contract – via CricTracker ❌
He has been picked by Peshawar Zalmi in the PSL 👀 #PSL9 #PSL2024 pic.twitter.com/qcvKlPmrrY
— Farid Khan (@_FaridKhan) December 18, 2023
यावर दुबई संघाने लीगच्या आयोजकांकडे या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची विनंती केली. लीगने एक मध्यस्थ नेमून दोन्ही बाजूनी दिलजमाई करण्याचा प्रयत्न केला. पण, तो अयशस्वी ठरला. त्यानंतर लीगचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड व्हाईट, युएई क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झायेद अब्बास, सुरक्षा व लाचलुचपत विरोधी अधिकारी कर्नल आझम यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. आणि दोन्ही बाजू तसंच पुरावे पाहून या समितीने नवीन उल हकच्या विरोधात कौल दिला.
नवीन आता २० महिन्यांसाठी इंटरनॅशनल लीग टी-२० मध्ये खेळू शकणार नाही. नवीन आयएलटी२० खेळणार नसला तरी याच कालावधीत दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या लीगमध्ये तो खेळणार आहे. आणि या लीगमध्ये दरबान सुपरजायंट्स या संघाबरोबर तो करारबद्ध झाला आहे. दरबान फ्रँचाईजी ही लखनौ सुपरजायंट्स फ्रँचाईजींच्या मालकांचीच आहे.
थोडक्यात, दुसऱ्या लीगमध्ये खेळण्यासाठी नवीनने युएईतील लीग खेळण्यास नकार दिल्याचं बोललं जात आहे. इंटरनॅशनल लीग टी-२० चा नवीन हक हा यशस्वी गोलंदाज होता. आणि २०२३ च्या हंगामात त्याने ११ बळी टिपले होते.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community