Neeraj Chopra : पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्रा भारतातील स्पर्धेत खेळणार 

Neeraj Chopra : १२ मेपासून होणाऱ्या फेडरेशन चषकात नीरज खेळणार आहे 

119
Neeraj Chopra : पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्रा भारतातील स्पर्धेत खेळणार 
Neeraj Chopra : पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्रा भारतातील स्पर्धेत खेळणार 
  • ऋजुता लुकतुके

ऑलिम्पिक सुवर्णपदक (Olympic gold medal) विजेता आणि जगज्जेता भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) मागच्या तीन वर्षांत पहिल्यांदाच भारतात खेळणार आहे. १२ मे पासून भुवनेश्वर इथं होणाऱ्या फेडरेशन चषक (Federation Cup) स्पर्धेत तो सहभागी होणार आहे. या हंगामातील आपली पहिली स्पर्धा तो १० मे ला दोहा इथं खेळणार आहे. ही प्रतिष्ठेची डायमंड लीग स्पर्धा असेल. तिथून तो थेट भुवनेश्वरला येईल. भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशनने नीरज (Neeraj Chopra) आणि किशोर जाना (Kishore Jana) हे दोन अव्वल भालाफेकपटू राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेत खेळणार असल्याचं ट्विट करून सांगितलं आहे.  (Neeraj Chopra)

(हेही वाचा- IPL 2024, Record Sixes : आयपीएलमध्ये कमीत कमी चेंडूंत १००० षटकार पूर्ण )

चोप्राचे प्रशिक्षक क्लाऊस बार्टोनेझ यांनीही पीटीआयशी बोलताना चोप्राच्या सहभागाविषयी माहिती दिली आहे. चोप्रा (Neeraj Chopra) आणि किशोर (Kishore Jana) जाना हे दोघंही दोहामध्ये १० तारखेला खेळणार आहेत. तिथून ते भुवनेश्वरला (Bhubaneswar) पोहोचतील. त्यामुळे भारतीय चाहत्यांना नीरज चोप्राचा खेळ मैदानावर प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे.  (Neeraj Chopra)

ऑलिम्पिक सुवर्ण जिंकल्यानंतर नीरज चोप्राने जगज्जेतेपदाबरोबरच आशियाई क्रीडास्पर्धेतही सुवर्ण जिंकलं आहे. तर त्याचा साथीदार किशोर जानाने आशियाई क्रीडास्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली आहे. नीरज चोप्रा २०२१ (Neeraj Chopra) मध्ये फेडरेशन चषक स्पर्धा खेळला आहे. आणि त्यावेळी त्याने ८७.८० मीटरची भालाफेक करत सुवर्ण जिंकलं होतं. त्यानंतर नीरजने आंतरराष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जून २०२१ मध्ये त्याने टोकयो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकलं. २०२२ मध्ये त्याने प्रतिष्ठेच्या डायमंड्स लीग स्पर्धेत विजेतेपद पटकावलं. तर २०२३ मध्ये त्याने जगज्जेतेपदही पटकावलं आहे. गेल्यावर्षी त्याने होआंगझाओ आशियाई खेळांत सुवर्ण पदक राखलं. (Neeraj Chopra)

(हेही वाचा- Devendra Fadnavis: पवार साहेब जे म्हणतील तेच उद्धव ठाकरे करतील: फडणवीसांचा पलटवार)

आता नीरज चोप्राला ९० (Neeraj Chopra) मीटरच्या भालाफेरीचं उद्दिष्ट्ं पार करायचं आहे. त्यादृष्टीने तो तयारी करतो आहे. (Neeraj Chopra)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.