- ऋजुता लुकतुके
पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत रौप्य पदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राचं (Neeraj Chopra) ब्रँड मूल्यांकन ३३५ कोटी रुपये इतकं झालं आहे. त्याने भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याला मागे टाकले आहे. पंड्याची ब्रँड व्हॅल्यू ३१८ कोटी रुपये आहे. नीरजच्या ब्रँड मूल्यांकनासोबतच वार्षिक जाहिरात शुल्क देखील वाढलं आहे. नीरज व्यतिरिक्त पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदक जिंकणाऱ्या मनू आणि कुस्तीमध्ये ५० किलो वजनी गटात अंतिम फेरीत पोहोचलेल्या विनेशच्या जाहिरात शुल्कात मोठी वाढ झाली आहे.
तर विराट कोहलीची ब्रँड व्हॅल्यू २९ टक्क्यांनी वाढली आहे. तो भारतातील सर्वात मौल्यवान सेलिब्रिटी बनला आहे. त्याने बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि रणवीर सिंग यांना मागे टाकले आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या मते, नीरज चोप्राचं ब्रँड मूल्यांकन २४८ कोटी रुपयांवरून ३३५ कोटी रुपयांवर गेलं आहे. ऑलिम्पिकपूर्वी नीरजचं ब्रँड मूल्यांकन भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या इतकंच होतं, पण आता तो त्याच्याही पुढे गेला आहे. (Neeraj Chopra Brand Value)
(हेही वाचा – Mumbai Crime: रक्षकच झाला भक्षक! १७ वर्षीय मुलीवर सुरक्षा रक्षकानेच केला बलात्कार)
विराटचं मूल्यांकन इतक्यावर
हार्दिक पांड्याचं ब्रँड मूल्यांकन ३१८ कोटी रुपये आहे. भारतीय क्रिकेटपटूंमध्ये हार्दिक पाचव्या क्रमांकावर आहे. नीरज चोप्राचा (Neeraj Chopra) जाहिरात दरही वाढला आहे. एका कंपनीकडून वर्षभरासाठी आता तो किमान ४४.५ कोटी रुपये वसूल करत आहे. मनू भाकेरचं शुल्क तर वार्षिक २५ लाखांवरून थेट दीड कोटी रुपयांवर गेलं आहे. मनूने अलीकडेच शीतपेय विकणाऱ्या कंपनीसोबत दीड कोटी रुपयांचा करार केला आहे. त्याचप्रमाणे, विनेश फोगटची एंडोर्समेंट फी वार्षिक २५ लाख रुपयांवरून ७५ लाख रुपये ते १ कोटी रुपये झाली आहे.
इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पॅकेज्ड फूड, आरोग्य, पोषण, दागिने, बँकिंग आणि शिक्षण यासारख्या श्रेणींमध्ये ब्रँडचा चेहरा बनवण्याची स्पर्धा आहे. स्क्रोलच्या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या सेलिब्रिटी ब्रँड मूल्यांकन अहवालानुसार, विराटचं मूल्यांकन आता १,९०४ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. प्रायोजकत्वाच्या बाबतीतही विराट कोहलीच आघाडीवर आहे. रणवीर सिंग दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याचं ब्रँड मूल्य १,७०३ कोटी रुपये आहे. यानंतर शाहरुख खानने १,०१२ कोटी रुपयांवर आहे. (Neeraj Chopra Brand Value)
(हेही वाचा – Shakib Al Hasan : बांगलादेशचा माजी कर्णधार शकीब अल हसनवर खूनाचा गुन्हा दाखल)
फक्त क्रिकेटपटूंचा विचार केला तर भारतात विराटच्या खालोखाल सध्या महेंद्रसिंग धोनीचा क्रमांक लागतो. धोनी निवृत्तीनंतरही ७९७ कोटी रुपयांच्या मूल्याचा धनी आहे. तर त्याच्या मागोमाग तिसऱ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर आहे. त्याचं ब्रँड मूल्य ७६३ कोटी रुपये इतकं आहे. रोहित शर्मा चौथ्या तर हार्दिक पांड्या पाचव्या स्थानावर आहेत. ब्रँड मूल्यांकनात घसघशीत वाढ झाली आहे ती मनू भाकेरच्या. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्य पदकं जिंकल्यावर तिचं मूल्य एकदम सहापट वाढलं आहे. (Neeraj Chopra)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community