-
ऋजुता लुकतुके
भालाफेकीतील ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राला (Neeraj Chopra) खेळताना लाईव्ह बघण्यासाठी त्याचा एक चाहता फैस अश्रफ अली २२,००० किलोमीटरचा सायकल प्रवास करून पॅरिसमध्ये पोहोचला आहे. केरळच्या कालिकतमधून फैसने प्रवासाला सुरुवात केली. आणि मजल दरमजल करत तो आता ऑलिम्पिकला पोहोचला आहे. गेल्यावर्षी जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान फैस नीरजला सगळ्यात आधी भेटला होता. तेव्हाच नीरजने त्याला पॅरिस ऑलिम्पिकचं आमंत्रण दिलं होतं. ते फैसने स्वीकारलं आणि चक्क सायकलवरून तो तिथे पोहोचला आहे.
(हेही वाचा – Uran Love Jihad : आरोपी दाऊद शेख अखेर पोलिसांच्या जाळ्यात)
वाटेत ३० देशांचा प्रवास करून फैस पॅरिसला पोहोचला आहे. आता तो लवकरच इथं नीरज चोप्राची (Neeraj Chopra) भेट घेईल. फैस हा त्याच्या अडीच लाख रुपयांच्या स्वर्ली सायकलवरून अनेक जागतिक मोहिमा करत असतो. जगात शांतता आणि एकोपा राहावा हा संदेश तो लोकांना देतो. अशाच एका प्रवासात कालिकत ते लंडन असा प्रवास करताना तो बुडापेस्टला होता. आणि तिथेच नीरज चोप्रा (Neeraj Chopra) अजिंक्यपद स्पर्धा खेळणार होता. तेव्हा दोघांची पहिली भेट झाली. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पी टी उषा यांनी फैसला नीरजची भेट घेण्यासाठी पत्र दिलं होतं.
या पहिल्या भेटीदरम्यानच नीरजने फैसला पॅरिस ऑलिम्पिकचं आमंत्रण दिलं. ७ ऑगस्टपासून नीरज चोप्राची (Neeraj Chopra) पॅरिस मोहीम सुरू होणार आहे. आणि यावेळी तो आपलं सुवर्ण पदक राखण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी फैस अश्रफ अली स्टेडिअममध्ये हजर असेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community