नीरज चोप्राचे ‘हेच’ ट्वीट आज उतरलं सत्यात…! नेटकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद!

नीरजला सुवर्ण पदक मिळताच त्याचे इंस्टाग्राम अकाउंटवरील फॉलोवर्स मिनिटाला दीड ते २ हजाराने वाढत गेले, तर ट्विटर अकाउंटवरही फॉलोवर्स वाढत गेले.

98

टोकियो ऑलिम्पिकच्या अंतिम टप्प्यात नीरज चोप्राने भारतीयांच्या पदरात सुवर्ण पदकाची भर टाकून ऑलिम्पिकमधील भारताची अनेक वर्षांची सुवर्ण पदकाची प्रतीक्षा संपवली. ज्या क्षणी नीरज चोप्राने भाला फेकीत प्रथम क्रमांक पटकावला त्याच क्षणी नीरज चोप्रावर भारतभरातून कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. तसेच नेटकऱ्यांनीही नीरज चोप्राच्या सोशल मीडियाच्या अकाउंटला उचलून धरले. नीरजला सुवर्ण पदक मिळताच त्याचे इंस्टाग्राम अकाउंटवरील फॉलोवर्स मिनिटाला दीड  ते २ हजाराने वाढत गेले, तर ट्विटर अकाउंटवरही फॉलोवर्स वाढत गेले.

(हेही वाचा : टोकियो ऑलिम्पिक २०२० : नीरज चोप्राची ‘सुवर्ण’ कमाल!)

नीरजच्या १५ नोव्हेंबर २०१७ रोजीचे ट्विट नेटकऱ्यांनी उचलून धरले! 

नीरजने १५ नोव्हेंबर २०१७ रोजी जे ट्विट केले होते, त्यामध्ये नेटकऱ्यांना त्याच्या मेहनतीवर आधारित केलेला ट्विट आकर्षित केले. त्यामध्ये नीरज चोप्राने म्हटले होते कि,

जब सफलता की ख्वाहिश आपको सोने ना दे
जब मेहनत के अलावा कुछ अच्छा ना लगे
जब लगातार काम करने के बाद थकावट ना हो
समझ लेना सफलता का नया इतिहास रचने वाला है

मिनिटाला वाढले फॉलोवर्स! 

नेटकऱ्यांनी नीराजच्या इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटवर शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव केला. कालपर्यंत भारतीयांना विशेष परिचित नसलेला नीरज चोप्रा त्यानंतर काही तासांत कोट्यवधी भारतीयांचा लाडका बनला. विशेषतः नेटकऱ्यांनी नीरजला उचलून धरले त्याचे २ तासांत ट्विटरवर तब्बल १३ हजार फॉलोवर्स वाढले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.