Neeraj Chopra : नीरज चोप्राने आपले जुने आणि यशस्वी प्रशिक्षक का बदलले?

Neeraj Chopra : नीरज चोप्राने क्लाऊस बार्टोनेझ यांच्यासह दोन ऑलिम्पिक पदकं जिंकली आहेत. 

34
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आपले जुने आणि यशस्वी प्रशिक्षक का बदलले?
  • ऋजुता लुकतुके

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) आणि त्याचे जर्मन प्रशिक्षक क्लाऊस बार्टोनेझ यांनी तब्बल पाच वर्षं एकत्र काम केलं आहे. या कालावधीत टोकयो ऑलिम्पिकमधील सुवर्ण, पॅरिसमधील रौप्य, डायमंड्स लीगच्या अंतिम फेरीतील रौप्य आणि डायमंड्स लीगच्या स्पर्धांमधील सुवर्ण व रौप्य अशी महत्त्वपूर्ण कामगिरी नीरज चोप्राने केली आहे. पण, आता पाच वर्षांनंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.

‘बार्टोनेझ आता ७५ वर्षांचे आहेत आणि त्यांना उर्वरित वेळ आपल्या कुटुंबीयांना द्यायचा आहे. शिवाय सततचा प्रवासही त्यांना झेपणारा नाही. त्यामुळे नीरज चोप्राबरोबर (Neeraj Chopra) नवीन हंगामात एकत्र राहायला त्यांनी विनम्रतापूर्वक नकार दिला आहे,’ असं भारतीय ॲथलेटिक्स असोसिएशनच्या सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. नीरजने नाही तर बार्टोनेझ यांनी सेवेतून मुक्त करण्याची विनंती नीरजला केली असल्याचं समजतंय.

(हेही वाचा – Congress : कार्यकर्त्यांने हातात राष्ट्रध्वज घेऊन बांधली सिद्धरामय्या यांच्या बुटाची लेस, काँग्रेसवर टीका)

२६ वर्षीय नीरज चोप्रा कारकीर्दीच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर बार्टोनेझ यांच्याशी जोडला गेला. सुरुवातीला २०१९ मध्ये बायोमेकॅनिकल तज्ञ म्हणून बार्टोनेझ नीरजबरोबर (Neeraj Chopra) काम करत होते. पण, तेव्हाचे नीरजचे प्रशिक्षक ऊवे हॉन यांचं साई आणि ॲथलेटिक्स फेडरेशनबरोबर भांडण झाल्यानंतर बार्टोनेझ यांनीच पूर्णवेळचा प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता. बार्टोनेझबरोबरच नीरजने जागतिक अजिंक्यपद आणि डायमंड्स लीग अजिंक्यपदही पटकावलं होतं.

सध्या नीरज नवीन हंगामाच्या सुरुवातीपूर्वी आपल्या हाताची आणि जांघेची दुखापत बरी करण्यावर मेहनत घेत आहे. त्यानंतर चोप्राच्या नवीन प्रशिक्षकाची निवड सुरू होईल. केंद्र सरकारच्या टॉप्स योजने अंतर्गत नीरजच्या (Neeraj Chopra) प्रशिक्षकाचा खर्च हा साई म्हणजेच क्रीडा प्राधिकरणाकडून करण्यात येतो.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.