Neeraj Chopra : नीरज चोप्रा मे महिन्यात डायमंड्स लीगने करणार हंगामाची सुरुवात

Neeraj Chopra : नीरजचं लक्ष्य टोकयो जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपदाचं असेल

28
Neeraj Chopra : नीरज चोप्रा मे महिन्यात डायमंड्स लीगने करणार हंगामाची सुरुवात
Neeraj Chopra : नीरज चोप्रा मे महिन्यात डायमंड्स लीगने करणार हंगामाची सुरुवात
  • ऋजुता लुकतुके 

२०२५ हे वर्षं जागतिक ॲथलेटिक्ससाठी कमालीचं व्यस्त असणार आहे. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा नवीन हंगामासाठी तयारी करत आहे. जांघेच्या दुखापतीशी झुंजणारा नीरज सध्या दुखापतीतून सावरतोय. आणि मे महिन्यातील डायमंड्स लीग स्पर्धेत तो आपल्याला खेळताना दिसणार आहे. १६ मे ला दोहा इथं ही स्पर्धा होणार आहे. आणि ती संपल्यावर नीरज युरोपमधील काही स्पर्धा खेळण्यासाठी युकेला रवाना होईल. आणि लक्ष्य असेल ते सप्टेंबरमध्ये टोकयोत होणाऱ्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद राखण्याचं. त्या दृष्टीने नीरजने आपला स्पर्धांचा कार्यक्रम आखला आहे. (Neeraj Chopra)

(हेही वाचा- Gold Rate in India : महानगरांमध्ये सोन्याचे दर ८५,००० रुपयांच्यावर, आणखी दरवाढीचा जाणकारांचा अंदाज)

जुलै ते ऑगस्ट महिन्यात युरोपात डायमंड्स लीगच्या काही स्पर्धा आहेत. आणि नीरज त्या खेळणार आहे. ‘नीरज सध्या दक्षिण आफ्रिकेत झेक प्रशिक्षक यान झेलेनी यांच्याबरोबर नवीन हंगामासाठी तयारी करत आहे. सुरुवातीला काही डायमंड्स लीग स्पर्धा तो खेळणार आहे,’ असं जागतिक ॲथलेटिक्स संघटनेचे मुख्य प्रशिक्षक राधाकृष्णन नायर यांनी सांगितलं आहे. डायमंड्स लीग मालिकेची सुरुवात २६ एप्रिलपासून होणार आहे. आणि पहिली स्पर्धा चीनमध्ये होणार आहे. पण, नीरज या मालिकेतील तिसऱ्या स्पर्धेपासून आपला हंगाम सुरू करेल. (Neeraj Chopra)

तोपर्यंत तो दक्षिण आफ्रिकेत हंगामपूर्व तयारी गुंतला आहे. टोकयो तसंच पॅरिस ऑलिम्पिकची तयारी नीरजने इथंच पेशेफस्ट्रूम इथं केली होती. पॅरिसनंतर नीरज झेलेनी यांच्याबरोबर सराव करू लागला आहे. नीरजने आतापर्यंत १ ऑलिम्पिक सुवर्ण आणि १ रौप्य जिकलं. आहे. त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी आहे ती ८९.९४ मीटरची. त्याला ९० मीटरच्या वर भालाफेक करायची आहे. आणि त्यासाठी त्याचं भालाफेकीचं तंत्र आणि त्यापूर्वी घ्यायची धाव यातील त्रुटी तो सध्या दूर करण्यावर काम करत आहे. (Neeraj Chopra)

(हेही वाचा- Raigad आणि Nashik जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा वाद कायम)

आधीचा हंगाम संपता संपता नीरजला जांघेच्या स्नायूच्या दुखापतीने काहीसं सतावलं होतं. तर त्याच्या डाव्या हाताचं हाडही मोडलं होतं. पण, या दोन्ही दुखापतींतून नीरज सावरला आहे. (Neeraj Chopra)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.