Neeraj Chopra : नीरज चोप्राची पॅरिस डायमंड्स लीगमधून माघार?

कमरेच्या दुखापतीमुळे नीरज चोप्राने रविवारच्या पॅरिस डायमंड्स स्पर्धेतून माघार घेतली आहे.

46
Neeraj Chopra : नीरज चोप्राची पॅरिस डायमंड्स लीगमधून माघार?
Neeraj Chopra : नीरज चोप्राची पॅरिस डायमंड्स लीगमधून माघार?
  • ऋजुता लुकतुके

ऑलिम्पिक सुवर्ण तसंच विश्वविजेतेपद पटकावणारा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) येत्या रविवारी होणारी पॅरिस डायमंड्स लीग स्पर्धा खेळणार नाहीए. स्नायूच्या दुखापतीमुळे त्याने माघार घेतल्याचं समजतंय. मागचे काही महिने त्याला या दुखापतीने त्रास दिला आहे. आणि दोहा स्पर्धेत त्याने सुवर्ण जिंकलं असलं तरी ९० मीटर फेकीचं उद्दिष्टं तो साध्य करू शकला नव्हता. या सुमारास त्याने अनेकदा स्नायूच्या दुखापतीचा उल्लेखही केला होता. अगदी अलीकडे ईएसपीएन या क्रीडा वाहिनीशी बोलताना तो म्हणाला होती की, ‘भालाफेक करताना मी डाव्या पायावर शरीराचा सगळा भार तोलतो तेव्हा अंतिम टप्प्यात माझ्या जांधेच्या स्नायूवर ताण पडतोय. ही गोष्ट मला सुधारायचीय. आणि ऑलिम्पिक पूर्वी ही दुखापत भरुन काढायची आहे.’

पॅरिस ऑलिम्पिकला एका महिन्यापेक्षा कमी कालावधी राहिला आहे. त्यापूर्वी मागचे काही महिेने कंबर आणि ही जांघेची दुखापत त्याला सतावतेय. ‘पॅरिसपूर्वी मी आणखी काही स्पर्धा खेळू शकलो असतो. आम्ही आधी तेच ठरवलं होतं. पण, इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर मी एक शिकलो आहे. खूप जास्त सराव करता तेव्हा कधी कधी काही क्षण थांबावंही लागतं. दुखापत असेल तर ती दुरुस्त करणं कधीही जास्त महत्त्वाचं. शेवटी तब्येत आणि तंदुरुस्तीशिवाय काहीही नाही,’ असं नीरज म्हणाला. (Neeraj Chopra)

(हेही वाचा – India T20 Champion : आता विराट कोहलीनेही मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार)

भालाफेकीत खेळाडू धावत अंतिम रेषेपर्यत येतो आणि त्यानंतर डाव्या पायावर थांबतो आणि तिथून भालाफेकीची कृती सुरू होते. या क्रियेत डाव्या पायाच्या हिप बोनवर सगळ्यात जास्त दाब येतो. आणि तिथून ताकद आणि ऊर्जा उजव्या हातात संक्रमित होते. डावा पाय रोवण्याच्या क्रियेला ब्लॉकिंग म्हणतात. आणि ते अत्यंत महत्त्वाचं आहे.

अलीकडे नीरज फिनलंड इथं पाओ नुर्मी ॲथलेटिक्स मीटमध्ये खेळला होता. आणि ८५.९७ मीटरच्या फेकीसह त्याने इथं सुवर्णही जिंकलं. टोकयो ऑलिम्पिकपेक्षा ही फेक कमीच होती. आणि या हंगामात ९० मीटरच्या पलीकडे जाण्याचं उद्दिष्टं त्याने ठेवलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.