- ऋजुता लुकतुके
टोकयो ऑलिम्पिकमधील सुवर्ण विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympics) पूर्वी ९० मीटरची भालाफेक करण्याचं उद्दिष्टं ठेवलं आहे. सध्या सरावा दरम्यान त्याने काही वेळा ९० मीटरचा टप्पा पारही केला आहे. पण, प्रत्यक्ष स्पर्धेत मात्र तो अजून ही कामगिरी करू शकलेला नाही. स्वत: बद्दल त्याला आत्मविश्वास आहेच. पण, त्या बरोबरच आपला सहकारी किशोर जानाबद्दलही नीरजने तोच विश्वास बोलून दाखवला आहे. (Neeraj Chopra on Kishore Jena)
(हेही वाचा- CM Eknath Shinde: राज्यात विकासाची गंगा वाहतेय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)
‘मी पॅरिस पूर्वीच ९० मीटरचा टप्पा ओलांडण्याचा प्रयत्न करेन. तयारी तर चांगलीच सुरू आहे. त्यामुळे ऑलिम्पिक (Olympics) पर्यंत लोकांना त्यासाठी वाट बघावी लागणार नाही. पण, शेवटी तशी कामगिरी नक्की कधी घडेल ते सांगता येणार नाही. तंदुरुस्ती आणि कौशल्य या दोन्हीवर मी सध्या काम करत आहे,’ असं नीरज म्हणाला. (Neeraj Chopra on Kishore Jena)
२६ वर्षीय नीरजची सर्वोत्तम कामगिरी आहे २०२२ च्या स्टोकहोम डायमंड्स लीगमधील ८९.९४ मीटरची भालाफेक. त्यानंतर अलीकडे सरावात त्याने ९० मीटरची भालाफेक केलेली आहे. सध्या ते टर्की इथं आपल्या प्रशिक्षकांबरोबर सराव करत आहे. आपल्या सरावाच्या कार्यक्रमाची कल्पना त्याने पत्रकारांशी ऑनलाईन माध्यमातून बोलताना दिली. (Neeraj Chopra on Kishore Jena)
(हेही वाचा- IPL 2024 Mayank Yadav : मयंक यादव उर्वरित आयपीएलला मुकणार?)
‘सुरुवातीला सगळा भर हा तंदुरुस्ती आणि ताकद कमावण्यावर होता. पण, त्याचा फायदा मला तंत्र सुधारण्यात झाला आहे. आता भालाफेकीतील ताकदही वाढली आहे,’ असं नीरज म्हणाला. टर्कीमधील सरावानंतर नीरज चोप्रा आपली पहिली स्पर्धा खेळेल ती १० मे ला दोहा इथली डायमंड्स लीग. त्यानंतर १८ जूनला फिनलंड इथं मानाच्या पावो नूर्मी स्पर्धा होणार आहेत. इथं जर्मनीचा उगवता भालाफेकपटू मॅक्स डेनिंगशी त्याचा मुकाबला होणार आहे. कारण, मॅक्सने अलीकडे ९० मीटरची भालाफेक केलेली आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर नीरज चोप्राला स्पर्धा निर्माण झालेली आहे. त्याच्या पुढील कामगिरीवर सगळ्यांचं लक्ष असेल. (Neeraj Chopra on Kishore Jena)
दरम्यान नीरजचा भारतीय संघातील साथीदार किशोर जानानेही आशियाई क्रीडास्पर्धेत ८७ मीटरच्या वर भालाफेक करत रौप्य जिंकलं होतं. जानाही नीरजबरोबरच सराव करत आहे. त्याच्या विषयी बोलतानाही नीरजने तोच विश्वास बोलून दाखवला. ‘आशियाई क्रीडास्पर्धा (Asian Games) आणि त्यानंतर किशोरने खूपच चांगली प्रगती केली आहे. आम्ही दोघं ९० मीटरसाठी थोडे कमी पडत आहोत. कोणास ठाऊक, तो माझ्या आधी ९० मीटरची कामगिरी करून जाईल. कधी ना कधी ते होणारच आहे,’ असं नीरजने बोलून दाखवलं. (Neeraj Chopra on Kishore Jena)
(हेही वाचा- IPL 2024 Riyan Parag : रियान परागच्या पाठीवर सुनील गावसकरांची कौतुकाची थाप)
हवामान, उकाडा यांचा फारसा विचार न करता सकारात्मक मनाने स्पर्धेला सामोरं जाण्यावर सध्या नीरज चोप्रा मेहनत घेतोय. (Neeraj Chopra on Kishore Jena)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community