Neeraj Chopra Silver : नीरजचं सुवर्ण हुकलं, सलग २ ऑलिम्पिकमध्ये पदकांचा विक्रम 

197
Neeraj Chopra Brand Value : नीरज चोप्राचं ब्रँड मूल्य ३३५ कोटींच्या दरात, हार्दिक पांड्यालाही टाकलं मागे
  • ऋजुता लुकतुके

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra Silver) ऑलिम्पिकमध्ये सलग दुसरं पदक जिंकताना गुरुवारी रात्री रौप्य पदकाची कमाई केली. आपल्या दुसऱ्या प्रयत्नांत केलेली ८९.४५ मीटरची भालेफेक त्याला दुसरा क्रमांक देऊन गेली. तर त्याचा निकटचा प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा नदीम अश्रफने नवीन ऑलिम्पिक विक्रमासह ९२.९७ मीटरची भालाफेक करत सुवर्ण नावावर केलं. नीरजची ८९.४५ मीटरची फेकही त्याची या हंगामातील सर्वोत्तम होती.

(हेही वाचा- देशवासीयांसाठी खुशखबर! BSNL ने देशभरात उभारले १५ हजार 4G टॉवर्स)

ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने ८८.५४ मीटरची भालाफेक करत तिसरा क्रमांक पटकावला. या रौप्य पदकासह ॲथलेटिक्समध्ये सलग दोन पदकं जिंकणारा नीरज चोप्रा (Neeraj Chopra Silver) हा पहिला भारतीय ॲथलीट ठरला आहे.

 पात्रता फेरीत केलेल्या सर्वोत्तम कामगिरीमुळे २६ वर्षीय नीरज चोप्रा सुवर्ण पदकाचा प्रमुख दावेदार होता. पण, अंतिम फेरीत पाकिस्तानच्या नदीमने एकदा नाही तर दोनदा ९० मीटरचा पल्ला गाठला. नीरज आता सुशील कुमार (Sushil Kumar), पी व्ही सिंधू (PV Sindhu) आणि मनू भाकर (Manu Bhaker) यांच्या पाठोपाठ दोन ऑलिम्पिक पदकं जिंकणारा चौथा भारतीय ठरला आहे. (Neeraj Chopra Silver)

(हेही वाचा- Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana : १.७२ लाख रोजगारासाठी १ लाख युवक-युवतींची मागणी नोंद)

नदीम आणि नीरज यापूर्वी १० वेळा आमने सामने आले आहेत. पण, यात प्रत्येक वेळी नीरज चोप्रानेच सुवर्ण जिंकलं होतं. पण, यंदा नदीमने यापूर्वी एकदा ९०.१७ मीटरची कामगिरी केलेली होती. त्यामुळे तो ऑलिम्पिक सुवर्णासाठी नक्कीच दावेदार होता. उलट नीरज चोप्रा दुखापतीमुळे मोजक्याच स्पर्धा खेळला. नदीमने गुरुवारी २००८ मध्ये नॉर्वेच्या आंद्रियास थॉर्किलसनने केलेला ९०.५७ मीटरचा ऑलिम्पिक विक्रम मोडला. भालाफेकीच्या इतिहासातील नदीमची ही सहावी मोठी भालाफेक आहे. तर सर्वोत्तम कामगिरी झेक रिपब्लिकच्या यान झेलेन्झीने नोंदवली आहे. त्याने ९८.४८ मीटरची भालाफेक केली होती (Neeraj Chopra Silver)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.