Neeraj Chopra : स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा डायमंड लीगच्या अंतिम फेरीसाठी पात्र

Neeraj Chopra : पुढील आठवड्यात ब्रसेल्स इथं ही स्पर्धा होणार आहे.

123
Neeraj Chopra : नीरज चोप्रा सरावासाठी दक्षिण आफ्रिकेला रवाना
  • ऋजुता लुकतुके

भारतीय स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) प्रतिष्ठेच्या डायमंड लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. डायमंड लीग ही ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारांमधील महत्त्वाची लीग आहे. वर्षभरात सहा स्पर्धांमधील कामगिरीच्या आधारे खेळाडूंना गुण देण्यात येतात. या गुणांवरून सर्वोत्तम ठरलेले ६ ॲथलीट हंगामाच्या शेवटी अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात. टेनिसमध्ये एटीपी टूअर फिनाले किंवा बॅडमिंटनमध्ये सुपरसीरिज अंतिम फेरीसारखी ही स्पर्धा आहे. यंदा दुखापतीमुळे नीरज दोन डायमंड्स लीग स्पर्धा खेळू शकलेला नाही. असं असतानाही त्याने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे हे विशेष.

नुकतंच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरजने (Neeraj Chopra) भालाफेकीत रौप्य पटकावलं. ते मिळवताना ८९.४५ मीटरची भालाफेक त्याने केली. पाकिस्तानचा अर्शद नदीम ९२.९७ मीटरच्या फेकीसह अव्वल आला. पण, डायमंड लीगमध्ये नदीम पात्र ठरलेला नाही. डायमंड लीग क्रमवारीतील अव्वल ६ खेळाडू १३ आणि १४ सप्टेंबर रोजी ब्रुसेल्स येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत. सध्या नीरज १४ गुणांसह चौथ्या स्थानावर राहिला. तर अर्शद केवळ ५ गुणांसह अंतिम ८ व्या स्थानावर राहिला.

(हेही वाचा – Paris Paralympics : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीत प्रवीण कुमारला सुवर्ण)

नीरज चोप्रा (Neeraj Chopra) यांच्यासह अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबर, जेकब वॉडलेज, एड्रियन मार्डरे आणि रॉडरिक जेन्की डीन डायमंड लीगच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत. डायमंड लीगच्या क्रमवारीत, ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स ४ स्पर्धांमध्ये २९ गुणांसह प्रथम, जर्मनीचा ज्युलियन वेबर ३ स्पर्धांमध्ये २१ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आणि चेक प्रजासत्ताकचा जेकब वडलेज ३ स्पर्धांमध्ये १६ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

दरम्यान, नीरज चोप्रा अवघ्या २ स्पर्धांमध्ये १५ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे, मोल्दोव्हाचा अँड्रियन मार्डेरे ४ स्पर्धांमध्ये १३ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे आणि जपानचा रॉडरिक जेरिक डीन ३ स्पर्धांमध्ये १२ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. नीरज चोप्राने या हंगामात केवळ दोन डायमंड लीगमध्ये भाग घेतला. या वर्षाच्या सुरुवातीला मे महिन्यात त्याने दोहा डायमंड लीगमध्ये भाग घेतला होता. जिथे तो ८८.८६ मीटर फेक करून दुसऱ्या क्रमांकावर राहिला. या कालावधीत जेकब वडलेजने ८८.८८ मीटर फेक करून पहिला क्रमांक पटकावला.

(हेही वाचा – Ganeshotsav 2024 : मुंबई पोलिसांना गणेशोत्सव काळात सतर्क राहण्याचे आदेश)

याशिवाय पॅरिस ऑलिम्पिकनंतर त्याने या मोसमातील दुसरी डायमंड लीग लुसाने येथे खेळली. जिथे त्याने ८९.४९ मीटरसह या मोसमातील सर्वोत्तम थ्रो केला. या लीगमध्येही तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने रौप्यपदक जिंकले. २६ वर्षीय नीरजने (Neeraj Chopra) दुसऱ्या प्रयत्नात हंगामातील सर्वोत्तम ८९.४५ मीटरची फेक साध्य केली. यासह तो सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी त्याने २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. नीरजच्या आधी कुस्तीपटू सुशील कुमार आणि बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू यांनी सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकली आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.