Neeraj Chopra : नीरज चोप्रासह जगातील अव्वल भालाफेकपटू भारतात खेळणार

Neeraj Chopra : सप्टेंबरमध्ये होणाऱ्या स्पर्धेत अव्वल १० खेळाडू सहभागी होणार आहेत

24
Neeraj Chopra : नीरज चोप्रासह जगातील अव्वल भालाफेकपटू भारतात खेळणार
Neeraj Chopra : नीरज चोप्रासह जगातील अव्वल भालाफेकपटू भारतात खेळणार
  • ऋजुता लुकतुके

नवीन वर्षी भारतीय ॲथलेटिक्स कॅलेंडरमध्ये आणखी एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेची भर पडली आहे. ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने यावर्षी सप्टेंबर महिन्यात एका भालाफेकीच्या स्पर्धेचं आयोजन केलं असून जेएसडब्ल्यू कंपनी स्पर्धेची मुख्य प्रायोजक आहे. महत्त्वाचं म्हणजे एका दिवसाच्या या स्पर्धेत नीरज चोप्रासह जगातील अव्वल १० भालाफेकपटू खेळणार आहेत. २०२९ ची ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा भारतात व्हावी असा एएफआयचा प्रयत्न आहे. शिवाय २०२७ च्या रिले स्पर्धेसाठीही भारताने उत्सुकता दाखवली आहे. आता आणखी एक ॲथलेटिक्स स्पर्धा भारतात होत आहे. (Neeraj Chopra)

(हेही वाचा- Mahakumbh 2025 साठी पोलिसांचे सायबर पेट्रोलिंग सुरू; 78 संशयास्पद वेबसाइट आणि 4 जणांना अटक)

ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे मावळते अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी या स्पर्धेविषयी माहिती दिली. ‘सप्टेंबरमध्ये ही स्पर्धा घ्यावी असा विचार आहे. ठिकाण अजून नक्की झालं नसलं, तरी निमंत्रितांची ही स्पर्धा असेल आणि सध्या अव्वल १० भालाफेकपटूंनी निमंत्रण स्वीकारलंही आहे. त्याशिवाय ज्युनिअर अजिंक्यपद स्पर्धाही भारतात व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,’ असं सुमारीवाला यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं. (Neeraj Chopra)

भारतात नीरज चोप्रा टोकयो सुवर्ण जिंकला तो दिवस भालाफेक दिवस म्हणून साजरा होतो. ऑलिम्पिकमध्ये भारताने मिळवलेलं ते पहिलं ऑलिम्पिक पदक होतं. आणि ते ही सुवर्ण त्यामुळे देशात भालाफेकीविषयीची जनजागृती वाढली आहे. नीरज चोप्राने स्पर्धेत सहभागी होण्याचं आश्वासन दिलं आहे. आणि तो अव्वल भालाफेकपटूंनाही भारतात आणणार आहे. ॲथलेटिक्स फेडरेशनने इथून पुढे दरवर्षी देशात एखादी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्याचं धोरण ठेवलं आहे. त्यामुळे देशात ॲथलेटिक्सचा विकास होईल असा त्यांचा होरा आहे. (Neeraj Chopra)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.