- ऋजुता लुकतुके
भारताला अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) पॅरिस डायमंड्स लीगमधील (Paris Diamond League) सहभागाबद्दलचा संभ्रम दूर करणारी पोस्ट ट्विटरवर शेअर केली आहे. ऑलिम्पिक काही दिवसांवर आलेलं असताना नीरजने डायमंड्स लीगसारख्या स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे त्याच्या तंदुरुस्तीबद्दल उलट सुलट चर्चा सुरू झाली होती. यावर मी या स्पर्धेत यंदा भाग घेणारच नव्हतो, असं म्हणत नीरजने चर्चेला पूर्णविराम दिला आहे. (Neeraj Chopra)
(हेही वाचा- Ajit Pawar : “राजकारणात आल्यापासून मी पक्ष बदलला नाही” अजित पवारांकडून व्हिडिओ ट्विट!)
‘कृपया सगळ्यांनी नीट ऐका, पॅरिसमधील डायमंड्स लीग मी खेळणारच नव्हतो. ती माझ्या स्पर्धा कॅलेंडरमध्ये नव्हतीच. त्यामुळे मी माघार वगैरे काही घेतलेली नाही. मी आता फक्त आणि फक्त ऑलिम्पिकची तयारी करत आहे,’ असं नीरजने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. (Neeraj Chopra)
Hello, everyone. Just to clarify: the #ParisDL wasn’t part of my competition calendar this season, so I haven’t ‘withdrawn’ from it. I’m focusing on getting ready for the Olympic Games.
Thanks for your understanding and support, and wishing all the athletes competing all the…
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) July 3, 2024
२६ वर्षीय चोप्रा यंदा आपलं दुसरं ऑलिम्पिक खेळणार आहे. पण मागचे काही महिने त्याला पायाच्या स्नायूच्या दुखापतीने थोडंफार सतावलं आहे. त्यामुळे मोजक्याच स्पर्धा खेळण्याचा त्याचा इरादा आहे. भारतीय ॲथलीटसाठी राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धा खेळणं अनिवार्य आहे. पण, ॲथलेटिक्स फेडरेशनने यंदा नीरजला खास सूट दिली. तसंच पॅरिस डायमंड्स लीगही (Paris Diamond League) खेळाडूंनी गांभीर्याने घ्यावी असं भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशनचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला (Adille Sumariwalla) यांनी अलीकडेच म्हटलं होतं. (Neeraj Chopra)
(हेही वाचा- Vasant More उद्धव ठाकरेंना साथ देणार? ‘मातोश्री ‘ वर भेट घेणार!)
पण, इथंही नीरजला दुखापतीमुळे सूट देण्यात आली आहे. नीरज काळजीपूर्वक आपल्या स्पर्धा निवडत आहे. दोन महिन्यांपूर्वी नीरजने पाओ नुर्मी ट्रॅक अँड फिल्ड स्पर्धेत भालाफेकीत सुवर्ण जिंकलं आहे. पण, त्यानंतर तो आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळलेला नाही. (Neeraj Chopra)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community