ऋजुता लुकतुके
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता आणि (Neeraj Chopra) विश्वविजेता नीरज चोप्राने आपली सर्वोत्तम कामगिरी अजून बाकी आहे, असं निक्षून सांगितलं आहे. इतकंच नाही तर ९० मीटर पेक्षा जास्त भालाफेक साध्य व्हावी यासाठी लेग ब्लॉकिंग सुधारत असल्याचंही त्याने म्हटलं आहे.
गेल्यावर्षी टोकयो ऑलिम्पिकमध्ये देशासाठी ऐतिहासिक सुवर्ण जिंकल्यानंतर २०२३ च्या सुरुवातीलाच (Neeraj Chopra) नीरजने विश्वविजेतेपद स्पर्धेतही सुवर्ण जिंकलं आहे. त्यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेतही त्याने आपलं सुवर्ण राखलं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भालाफेकीत नीरज आपलं वर्चस्व राखून आहे.
आता नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना त्याने आपली सर्वोत्तम कामगिरी अजून बाकी आहे, असं मोकळेपणाने सांगून टाकलं.
‘मला इथं स्पष्ट करायचं की, माझी सर्वोत्तम कामगिरी अजून झालेली नाही. इतक्या स्पर्धांमध्ये खेळलो. पण, कुठेही मला असं वाटलं नाही की, मी सर्वोत्तम कामगिरीच्या जवळपासही आहे. अजून ६ मीटर कमी पडतायत,’ असं नीरज (Neeraj Chopra) एका खाजगी कार्यक्रमात बोलताना म्हणाला.
(हेही वाचा – Maratha Reservation : छत्रपती संभाजीनगरमध्ये ४८ तासांसाठी इंटरनेट सेवा बंद)
नीरजने (Neeraj Chopra) अर्थातच बोट दाखवलंय ते भालाफेकीत ९० मीटरचं अंतर पार करण्याकडे. कारण, मागची दोन वर्षं तो त्यासाठी प्रयत्न करतोय. आणि आपलं हे उद्दिष्ट त्याने उघडपणे बोलूनही दाखवलं आहे. आता ते गाठण्यासाठी काय करायचं हे त्याने ठरवलेलं दिसतंय.
‘स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये मी ८९.९४ मीटरपर्यंत पोहोचलो होतो. भाला थोडा उशिरा फेकला असता तर ९० मीटर झालेही असते. आता नव्याने प्रयत्न करायचे आहेत. आणि सातत्याने ९० मीटर सर करायचे आहेत. (Neeraj Chopra) त्यासाठी माझं लेग ब्लॉकिंग सुधारावं लागेल. मी जिथून भालाफेक करतो ती स्थिती सुधारावी लागेल. आणि पुढील वर्षभर त्यावरच मेहनत घेणार आहे,’ असं नीरजने स्पष्ट केलं.
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) November 15, 2017
नीरज चोप्राची (Neeraj Chopra) लवचिकता आणि चपळाई यांचं नेहमीच कौतुक होतं. पण, आता त्याला पायाच्या हालचाली सुधारायच्या आहेत. ‘माझे प्रशिक्षक मला सांगतात की, भालाफेक ६० टक्के पायांच्या हालचाली आणि ४० टक्के कंबर, खांदे आणि वरील अवयवांच्या हालचाली यावर अवलंबून आहे. त्यानुसार मी आता पायाच्या हालचालींवर काम करणार आहे,’ असं नीरजने सांगितलं.
थोडक्यात, पॅरिस ऑलिम्पिकसाठी नीरज आता सज्ज होतोय. आणि त्याचवेळी त्याला ९० मीटरचा पल्ला गाठायचाय. पॅरिसची तयारी तो वेगळ्या पद्धतीने करतोय. (Neeraj Chopra)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community