World Athletic Championship: नीरज चोप्राची कॉमनवेल्थ स्पर्धेतून माघार

148

गेल्या वर्षी टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने दुखापतीमुळे बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेतून माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे. बर्मिंगहॅम येथे येत्या 28 जुलैपासून कॉमनवेल्थ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मात्र, स्पर्धा सुरु होण्यास अवघ्या 48 तासांचाच अवधी बाकी असताना नीरजने माघार घेतली. नीरज दुखापतीमुळे बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेतून बाहेर झाला आहे, अशी माहिती भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस राजीव मेहता यांनी याबाबत माहिती दिली आहे.

(हेही वाचा – शिवसेना, धनुष्यबाणावरील दाव्याबाबत सर्वोच्च न्यायालयात १ ऑगस्टला फैसला)

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने १८ व्या जागतिक एथलेटिक्स विजेतेपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत रौप्य पदक पटकावले. यामुळे तब्बल १९ वर्षांनी नीरजने पदकांचा दुष्काळ संपवला. त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे त्याच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, या स्पर्धेदरम्यान मांडीला दुखापत झाल्याने त्याला महिनाभर मैदानापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या भालाफेक स्पर्धेत रौप्य पदक जिंकून इतिहास रचला. या स्पर्धेत पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. त्याने 88.13 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह रौप्य पदक जिंकले. अशाप्रकारे तब्बल 19 वर्षांनंतर भारताला या स्पर्धेत पदक मिळाले आहे. यापूर्वी 2003 मध्ये लॉन्ग जंपर अंजू बॉबी जॉर्जने जागतिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.

नीरज चोप्राचा पहिला थ्रो फाऊल ठरला तर दुसऱ्या थ्रोमध्ये वापसी करताना त्यानं 82.39 मीटर भाला फेकला. तर नीरज चोप्रानं आपल्या तिसऱ्या प्रयत्नात 86.37 मीटर भाला फेकत पुन्हा वापसी केली. नीरज चोप्रा चौथ्या प्रयत्नानंतर दुसऱ्या क्रमांकावर आला. नीरजने चौथ्या प्रयत्नानंतर 88.13 मीटर्सवर भाला फेकला आणि हा त्याचा सर्वोत्कृष्ट थ्रो ठरला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.