ऋजुता लुकतुके
नेदरलँड्सच्या संघाने या विश्वचषकातील कदाचित सगळ्यात धक्कादायक निकाल मंगळवारी नोंदवला आहे. आधीच्या दोन सामन्यात दणदणीत विजय मिळवलेल्या दक्षिण आफ्रिकन संघाला यांनी चक्क ३८ धावांनी धूळ चारली. नेदरलँड्सचा संघ हा सेमी व्यावसायिक क्रिकेटपटूंनी तयार झालाय.
म्हणजेच क्रिकेट व्यतिरिक्त संघातले बहुतेक लोक उदरनिर्वाहासाठी इतर गोष्टीही करतात. त्यातलाच एक आहे पॉल व्हॅन मीकरन. त्याचं पहिलं प्रेम क्रिकेट हेच आहे. पण, क्रिकेटवर पोट चालत नाही म्हणून तीन वर्षांपूर्वी तो चक्क उबर ईट्सचा फूड डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता.
(हेही वाचा-Lalit Patil : ड्रग्स माफिया ललित पाटीलला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई )
त्यानंतर हळू हळू कोरोना संपला. आणि क्रिकेट पुन्हा सुरू झालं. क्लब पातळीवर मीकरन पुन्हा खेळायला लागला. पण, उबरईट्स सुटलंच नाही. काल आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात एडन मार्करम आणि जम बसलेला क्लासेन यांचे महत्त्वाचे बळी मिळवल्यावर त्यांचं जुनं तीन वर्षांपूर्वीचं ट्विट पुन्हा व्हायरल होतंय.
Should’ve been playing cricket today 😏😢 now I’m delivering Uber eats to get through the winter months!! Funny how things change hahaha keep smiling people 😁 https://t.co/kwVEIo6We9
— Paul van Meekeren (@paulvanmeekeren) November 15, 2020
ते साल होतं २०२० आणि कोव्हिडमुळे टी-२० विश्वचषक (Netherlands Stun South Africa) पुढे ढकलावा लागला होता. अशावेळी मीकरनकडे रोजगाराचाही प्रश्न होता. आणि त्याने उबर इट्सचा पर्याय नाईलाजाने निवडला. तेव्हाचं हे ट्विट आहे. विश्वचषकाचं एक ट्विट रिट्विट करून मीकरन म्हणतो, ‘मी खरंतर आता क्रिकेट खेळत असलो असतो. पण, त्याऐवजी उबर ईट्सचा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतोय. तुमच्यावर काय वेळ येईल सांगता येत नाही. तेव्हा हसत राहा.’
मीकरनकडे घरभाडं, पेट्रोल, रोजचं जेवण यासाठीही तेव्हा पैसे नव्हते. पण, क्रिकेट कधी ना कधी सुरू होईल याची आशाही होती. त्यामुळे कायमस्वरुपी नोकरी न पत्करता त्याने उबर ईट्सचा पर्याय निवडला. इथं तो पार्ट टाईम कामही करतो. आणि उरलेला वेळ आपल्या क्रिकेटला देतो. आताही उबर ईट्सने त्याची निवृत्तीनंतरची सोय केल्यामुळे तो खुश आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community