टोकियो पॅरालिम्पिक २०२० मध्ये सोमवार भारतासाठी विशेषतः क्रीडा क्षेत्रासाठी मोठा उत्साहाचा ठरला. सकाळीच भारताची नेमबाजपटू अवनी लेखराने १०० मीटर रायफल शूटिंगमध्ये सुवर्ण पदक मिळवले. सकाळपासून काही क्षणात अवनीवर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. त्याचबरोबर अवनीच्या ट्विटर अकाऊंवरही नेटकऱ्यांची गर्दी सुरु झाली. यात अवनीने २३ जुलै रोजी टाकलेला व्हिडिओ नेटकऱ्यांनी अक्षरशः उचलून धरला आहे.
काय आहे ‘तो’ व्हिडिओ?
हा व्हिडिओ अवनीच्या घरातील रायफल शूटिंग रेंजचा आहे. लॉकडाऊनमध्ये अवनीने तिच्या थ्री बीच-के फ्लॅटमध्येच इलेकट्रोनिक शूटिंग रेंज उभी केली होती. त्यामध्ये हॉलमध्ये टार्गेट बसवले आणि थेट किचन येथे बसून अवनी रायफलने नेम धरत टोकियो पॅरालिम्पिक २०२० साठी सर्व करत होती. तसे अवनीने तिच्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. तसेच मी ऑनलाईन मोबाईलद्वारे प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन घेत होती.
— 𝓐𝓿𝓪𝓷𝓲 𝓛𝓮𝓴𝓱𝓪𝓻𝓪 अवनी लेखरा 𝐏𝐋𝐘 (@AvaniLekhara) July 23, 2021
भरघोस प्रतिसाद!
अवनीला सुवर्ण पदक मिळतात सकाळपासून नेटकऱ्यांनी अवनीच्या या व्हिडिओवर अक्षरशः कौतुकाचा वर्षाव केला आहे. ट्विटरवरील या व्हिडिओवरील लाईलची संख्या अवघ्या २ तासांत ६०० वरून ठरेल १४०० झाली. सतेच अवनीच्या ट्विटर फॉलोवर्समध्येही दोन तासांतच ६ हजारांहून थेट ११ हजार झाली, दार मिनिटाला फॉलोवर्स संख्या वाढत आहे.
अवनीवर शुभेच्छांचा वर्षाव!
अवनीला देशभरातून मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय, उद्योगपती आनंद महिंद्रा, टोकोयो ऑलिम्पिकमधील वेट लिफ्टींगमध्ये रौप्य पदक विजेती मीराबाई चानू, अभिनेता अक्षय कुमार, माजी क्रिकेटपासून वीरेंद्र सेहवाग यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अवनीला शुभेच्छा दिल्या.
Join Our WhatsApp Community