- ऋजुता लुकतुके
आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत थायलंडला ३-२ असं हरवून भारताने पहिल्यांदा ही स्पर्धा जिंकली, तेव्हा महिला संघ कोर्टवर एका खेळाडूभोवती जमला. सगळ्यांनी अगदी अभावितपणे १७ वर्षांच्या या चिमुरडीला उचलून धरलं. आणि जल्लोष केला. उपांत्य फेरी आणि मग अंतिम फेरीत तिसरा एकेरी सामना आपल्यापेक्षा जास्त क्रमवारी असलेल्या खेळाडूविरुद्ध खेळत आणि जिंकत या मुलीने भारताला जिंकून दिलं होतं. म्हणूनच दिल्लीजवळ फरिदाबादची अनमोल खरब (Anmol Kharb) सध्या भारताच्या या विजयाची स्टार ठरलीय. (New Indian Badminton Star)
अंतिम फेरीत केली ही पुनरावृत्ती
इतकंच नाही तर सायना नेहवाल आणि पी व्ही सिंधू नंतर भारतीय महिला बॅडमिंटनला नवीन चेहरा मिळाल्याची चर्चाही होतेय. तसं म्हटलं तर भारतात आता बॅडमिंटनच्या चांगल्या पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या आहेत. पण, अशा कुठल्याही फॅन्सी क्लबमध्ये ती जात नाही. तरीही गेल्यावर्षी तिने राष्ट्रीय स्पर्धा जिंकली. आणि त्याच्या जोरावरच आशियाई बॅडमिंटन सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत तिसरा एकेरी सामना खेळण्यासाठी तिची निवड झाली. (New Indian Badminton Star)
पण, भारताच्या सगळ्याच लढतीत अनमोल उठून दिसली. बलाढ्या चीनला हरवताना भारताची २-२ अशी बरोबरी होती. आणि पाचव्या सामन्यात अनमोलचा मुकाबला होता तो चीनच्या वू लू यूबरोबर. अनमोलने (Anmol Kharb) कुठलंच दडपण न घेता हा सामना ३ गेममध्ये जिंकला. पुन्हा उपांत्य फेरीत तिने जपानच्या क्रमवारीत २९ व्या स्थानावर असलेल्या नातसुकी निदेराला दोन गेममध्येच हरवलं. आणि या सगळ्यावर कडी म्हणून तिने अंतिम फेरीतही पुन्हा याचीच पुनरावृत्ती केली. (New Indian Badminton Star)
(हेही वाचा – Shiv Jayanti 2024 : ‘जय जय जय शिवाजी’च्या गजराने महाराष्ट्र सदन दुमदुमले; शिवजयंती उत्साहात साजरी)
अनमोलची जागतिक क्रमवारी आहे इतकी
भारताचे राष्ट्रीय कोच अनमोलचा सामना बघताना कायम चेहऱ्यावर मंद स्मित बाळगून होते. ‘या लहान वयात निर्णायक एकेरीचा सामना खेळायलाच हिंमत लागते. आणि त्यासाठी आत्मविश्वास लागतो. तुमचा खरा कस इथंच लागतो. आणि या कसोटीवर अनमोल (Anmol Kharb) खरी उतरली. तिची फटक्यांची निवड अचूक होती. आणि महत्त्वाचं म्हणजे दृष्टिकोण कायम सकारात्मक होता,’ असं गोपीचंद अनमोलचं कौतुक करताना म्हणाले. (New Indian Badminton Star)
स्वत: अनमोलही (Anmol Kharb) आपली कामगिरी आणि भारताने मिळवलेल्या विजयामुळे खुश आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ती डिसेंबरमध्ये झालेली बॅडमिंटन राष्ट्रीय स्पर्धा जिंकली होती. याशिवाय इतर कुठल्याही जागतिक स्पर्धेत तिने सहभाग घेतलेला नाही. आता तिची जागतिक क्रमवारीही ४७२ इतकी आहे. पण, आता यात नक्की सुधारणा होईल. (New Indian Badminton Star)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community