ऋजुता लुकतुके
सेवादलाचा एच एच मणिकांता या २१ वर्षीय तरुणाने ॲथलेटिक्समध्ये शभर मीटर धावण्यात नवा राष्ट्रीय विक्रम (New Record) रचला आहे. बेंगळुरू इथं सुरू असलेल्या राष्ट्रीय खुल्या ॲथलेटिक्स स्पर्धेत त्याने प्राथमिक फेरीत त्याने १०.२३ सेकंदांची वेळ नोंदवली.
या कामगिरीबरोबरच स्पर्धेच्या अंतिम फेरीतही त्याने दिमाखात प्रवेश केला आहे. मणिकांताच्या कामगिरीचं मोल मोठं आहे कारण, त्याने २०१६ पासून अबाधित असलेला विक्रम मोडला आहे. आधीचा विक्रम ओडिशाचा ॲथलीट अमेय कुमार मलिकच्या नावावर होता. त्याने १०० मीटरचं अंतर १०.२६ सेकंदात पार केलं होतं. सात वर्षांनंतर हा विक्रम मोडला आहे.
National record in men’s 100m. It’s 10.23 seconds pic.twitter.com/bKh7aMdrcu
— Athletics Federation of India (@afiindia) October 11, 2023
मूळचा कर्नाटकच्या उडुपी इथून आलेला मणिकांता २०२० मध्ये सेवादलात भरती झाला आणि तेव्हापासून तो हैद्राबाद इथं प्रशिक्षण घेतोय. २०२३ मध्ये सलग तिसऱ्यांदा त्याने ११ सेकंदांच्या खाली वेळ दिली आहे. यापूर्वी आंतरराज्य विजेतेपद स्पर्धेत त्याने १०.९१ सेकंदांची वेळ दिली होती. तर सेवादलाच्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याची वेळ होती १०.३२ सेकंद. या दोन्ही वेळा पार करून मणिकांत आता देशातला अव्वल १०० मीटर धावपटू ठरला आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community