पुढच्या वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपसाठी असे असणार नियम

सगळे ज्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, ती भारत विरुद्ध न्यूझीलंडमधील पहिल्या वर्ल्ड टेस्ट चँपियनशीपच्या अंतिम कसोटी सामन्याची. 2013 पासून वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपची चर्चा होती, 2019 पासून त्याची सुरुवात झाली. या पहिल्या चँपियनशिपनंतर दुस-या चँपियनशिपची सुरुवात भारत आणि इंग्लंड दरम्यान ऑगस्टमध्ये होणा-या कसोटी मालिकेपासून होण्याची शक्यता आहे. या दुस-या वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपसाठी नियमांत काही बदल होणार आहेत. आयसीसीचे अंतरिम मुख्य सचिव जेफ अॅल्लार्डिस यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ते नियम नेमके कोणते आहेत?

पर्सेंटेज ऑफ पॉइंट्स

  • प्रत्येक कसोटी मालिकेतील पॉइंट्स हे पहिल्या सामन्यापासून मोजले जातील.
  • त्यासाठी एकूण 6 कसोटी मालिकांचे(3 मायदेशात आणि 3 परदेशात)पॉइंट्स मोजले जातील.
  • प्रत्येक मालिकेचे 120 पॉइंट्स प्रमाणे मोजणी करण्यात येईल.
  • दुस-या वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपसाठीच्या नियमांमधील सर्वात मोठा बदल म्हणजे, प्रत्येक पॉइंट्सची मोजणी मालिकेनुसार न करता प्रत्येक सामन्यानुसार केली जाईल.
  • त्यामुळे समजा 4 कसोटी सामन्यांची मालिका असेल आणि दोन्ही संघ 2-2 सामने जिंकले, तर त्याची समान विभागणी केली जाईल.
  • त्यामुळे प्रत्येक संघ जास्त पॉइंट्स मिळवण्यासाठी जास्तीत जास्त सामने जिंकण्याचा प्रयत्न करेल.

संघांना होऊ शकतो तोटा

एकदिवसीय किंवा टी-20 मालिकांपेक्षा कसोटी क्रिकेटमध्ये मायदेशात आणि देशाबाहेर खेळल्या जाणा-या सामन्यांचा, संघाच्या गुणांवर मोठा परिणाम होत असतो. नवीन नियमांनुसार प्रतिस्पर्धी संघांना 3 सामने मायदेशात आणि 3 सामने परदेशात खेळणे आवश्यक असणार आहे. त्यामुळे बलाढ्य संघांसोबत जास्त सामने देशाबाहेर खेळताना काही संघांना याचा तोटा होऊ शकतो. तसेच प्रत्येक संघ एकमेकांसोबत कसोटी सामने खेळत नसल्याने त्यांचे एकत्रित मूल्यांकन करणे कठीण होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here