न्यूझीलंंडची आगामी विश्वचषकातून माघार

आयसीसीने काही दिवसांपूर्वीच आगामी सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले होते. 2024 साली होणारी विश्वचषक स्पर्धा  वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. ऑलिम्पिक स्पर्धेवर लक्ष ठेवून 2024 साली होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेचं संयुक्त यजमानपद अमेरिकेला  देण्यात आलं आहे. आयसीसीनं बुधवारी पुढील वर्षी वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या अंडर 19 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केले आहे. पण, या स्पर्धेचे वेळापत्रक मिळताच न्यूझीलंड संघाने या स्पर्धेतून माघार घेतली आहे.

हे आहे माघार घेण्यामागचं कारण 

न्यूझीलंडनं हा निर्णय देशातील अल्पवयीन नागरिकांना स्पर्धेतून परत आल्यानंतर पाळाव्या लागणाऱ्या अनिवार्य क्वारंटाईन  नियमांमुळे घेतला आहे. न्यूझीलंडच्या जागी स्कॉटलंडचा 16 वी टीम म्हणून स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. आयर्लंडला  या विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र होण्यात अपयश आलं होतं. 14 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान वेस्ट इंडिजमधील 10 वेगवेगळ्या ठिकाणी ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील स्पर्धेने या विश्वचषकाला सुरूवात होणार आहे.

यांच्या नेतृत्त्वात जिंकला भारताने विश्वचषक 

अंडर-19 विश्वचषक स्पर्धेला 1988 पासून सुरुवात झाली आहे.आतापर्यंत 13 वेळा ही स्पर्धा खेळवण्यात आली. त्यामध्ये भारताने सर्वाधिक 4 वेळा ट्रॉफी जिंकली आहे.ऑस्ट्रेलियाला 3, पाकिस्तानला 2 तर बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि इंग्लंडला प्रत्येकी 1-1 वेळा विजय मिळवता आला आहे. 2020 साली झालेल्या अखेरच्या अंडर-19 वर्ल्ड कप फायनलमध्ये बांगलादेशने भारताचा पराभव केला होता. भारताने 2000 साली मोहम्मद कैफच्या नेतृत्वात, 2008 साली विराट कोहली, 2012 साली उन्मुक्त चंद आणि 2018 साली पृथ्वी शॉच्या नेतृत्वात अंडर-19 विश्वविजेता बनला होता.

 (हेही वाचा : स्टॅण्डअप कॉमेडियन वीर दास विरोधात वाढता असंतोष! काय आहे प्रकरण? )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here