WFI Row : कुस्ती फेडरेशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंग यांची क्रीडा मंत्रालयाशी जुळवून घेण्याची भूमिका

क्रीडा मंत्रालयाने केलेली निलंबनाची कारवाई मागे घ्यावी यासाठी संवाद साधण्याची कुस्ती फेडरेशनची नवीन भूमिका.

239
WFI Row : जागतिक कुस्ती फेडरेशनने भारतीय संघटनेवरील बंदी तातडीने हटवली
WFI Row : जागतिक कुस्ती फेडरेशनने भारतीय संघटनेवरील बंदी तातडीने हटवली
  • ऋजुता लुकतुके

भारतीय कुस्ती प्रशासनामधील वादात आता नवनिर्वाचित कुस्ती फेडरेशनच्या कार्यकारिणीने क्रीडा मंत्रालयाशी जुळवून घेण्याचा पवित्रा घेतला आहे. म्हणजे क्रीडा मंत्रालयाने फेडरेशन निलंबित केली असली तरी मंत्रालयाशी चर्चा करून हे निलंबन मागे घेण्याची विनंती आता करण्यात येणार आहे.

निलंबित फेडरेशनचे अध्यक्ष संजय सिंग (President Sanjay Singh) यांनी मंगळवारी संध्याकाळी मीडियाशी बोलताना ही माहिती दिली. यापूर्वी संजय सिंग यांनी मंत्रालयाच्या निर्णयाविरुद्ध कोर्टात जाण्याची भाषा केली होती. पण, आता एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी मंत्रालयाबरोबरची बोलणी फिसकटली तरंच न्यायालयात जाऊ असं म्हटलं आहे.

निलंबित कुस्ती फेडरेशनच्या कार्यकारिणीची बैठक नवी दिल्लीत पार पडली. त्यानंतर सिंग मीडियाशी बोलत होते. ‘सगळ्यांच्या भल्यासाठीच आम्हाला क्रीडा मंत्रालयाशी दोन हात करायचे नाहीत. सध्या तरी संवादाच्या मार्गाने आम्हाला पुढे जायचं आहे. पण, मंत्रालयाने फेडरेशनवरील निलंबनाची कारवाई मागे घ्यावी,’ अशी भूमिका कुस्ती फेडरेशनने मांडली आहे.

(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : हेमा मालिनी रामायणावर आधारित नाटक सादर करणार)

कुस्ती फेडरेशनमध्ये आता उद्भवलेली परिस्थिती ही माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण यांच्या विरोधात काही खेळाडूंनी केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या तक्रारींनंतर उद्भवली आहे. १२ डिसेंबरला कुस्ती फेडरेशनची निवडणूकही झाली. आणि संजय सिंग यांनी अध्यक्ष म्हणून निवड झाली. पण, संजय सिंग हे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण यांचे निकटवर्तीय असल्यामुळे बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट यासारख्या आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या कुस्तीपटूंनी संजय सिंग यांना विरोध दर्शवत पद्मश्री, खेलरत्न यासारखी पदकं परत देण्याचं पाऊल उचललं. तर नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंग यांनीही तडकाफडकी बैठक बोलावून तातडीने काही निर्णय घेतले. संजय सिंग यांची काम करायची पद्धत ही देशाच्या क्रीडा धोरणाशी सुसंगत नाही, असा ठपका ठेवत क्रीडा मंत्रालयाने निवडणुकीनंतर ३ दिवसांतच कुस्ती फेडरेशन निलंबित केली. शिवाय कुस्तीचा कारभार हाकण्यासाठी ३ सदस्यीय तात्पुरती समितीही नेमली.

पण, तात्पुरती समिती आणि निवडणुकीत निवडून आलेली फेडरेशनची कार्यकारिणी हे दोघेही अलीकडे आपापले निर्णय जाहीर करत होते. शिवाय, संजय सिंग यांनी कुस्ती फेडरेशन ही स्वायत्त संस्था असल्यामुळे आणि निवडणूक प्रक्रियेतून आपली निवड झाली असल्यामुळे आपलाच फेडरेशनवर अधिकार असल्याची भूमिका मांडली होती. तर क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.

कार्यकारिणीची बैठक झाल्यानंतर आता त्यांनी पवित्रा बदलला आहे. दोघांमधील भांडणामध्ये कुस्तीपटूंचं मात्र नुकसान होत आहे. राष्ट्रीय स्पर्धा झालेल्या नाहीत, राष्ट्रीय शिबीर भरवलेलं नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे जागतिक कुस्ती संघटनेनं भारतीय कुस्ती फेडरेशनची मान्यता काढून घेतली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.