Nicolas Pooran : एका षटकांत ३६ धावा करत निकोलस पुरनची युवराजशी बरोबरी

Nicolas Pooran : पुरनच्या तोफेसमोर होता अफगाणिस्तानचा अझमतुल्ला ओमारझाई.

16767
Nicolas Pooran : एका षटकांत ३६ धावा करत निकोलस पुरनची युवराजशी बरोबरी
  • ऋजुता लुकतुके

एरवी तेज गोलंदाजीचं वर्णन तोफखाना असं करतात. पण, वेस्ट इंडिज विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात तोफ धडाडली ती निकोलस पुरनची. त्याचा धडाकाच असा होता की, वेस्ट इंडिजने या टी-२० विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्या नोंदवलीच. शिवाय अफगाणिस्तानवर ३६ धावांच्या मोठ्या फरकाने विजयही मिळवला. असे निकाल यंदाच्या स्पर्धेत तसे दुर्मिळच. सी गटातील या शेवटच्या साखळी सामन्यात फक्त निकोलस पुरनचीच चर्चा होती. (Nicolas Pooran)

निकोलस पुरनने ५३ चेंडूंत ९८ धावा केल्या आणि यात ८ षटकार लगावले. पण, यातलं अझमतुल्ला ओमारझाईचं चौथं षटक विघातक ठरलं. पुरन आणि जॉनसन चार्ल्स यांनी तशीही डावाला आक्रमक सुरुवातच केली होती. पण, चौथ्या षटकात अगदी अफगाणी प्रेक्षकही तोंडात बोट घालून बसले होते. पुरनने पहिले दोन चेंडू सीमापार फटकावले. तिसरा चौकार, पाचवा लेगबाईजवर ४ धावा. मग एक नोबॉल ज्यावर चौकार मिळाला. मग एक वाईडवर चौकार आणि शेवटचा चेंडू पुन्हा एकदा पुरनने सीमापार भिरकावला. (Nicolas Pooran)

यापूर्वी टी-२० विश्वचषकात युवराज सिंग, दिपेंद्र ऐरी, कायरन पोलार्ड आणि रोहीत शर्मा यांनी एका षटकांत ३६ धावा वसूल केल्या आहेत. (Nicolas Pooran)

(हेही वाचा – IAS अधिकारी Tukaram Mundhe यांची पुन्हा बदली; ‘या’ खात्याचा पदभार स्वीकारण्याचे आदेश!)

पुरनने या सामन्यात आपल्या टी-२० प्रकारातील २,००० आंतरराष्ट्रीय धावाही पूर्ण केल्या. तर षटकारांच्या बाबतीत ख्रिस गेलला मागे टाकलं. गेलच्या नावावर टी-२० मध्ये १२८ षटकार होते. पुरनने आता ४ षटकार जास्त खेचले आहेत. (Nicolas Pooran)

एका षटकांत ३६ धावा कुणी आणि कधी काढल्या आहेत ते पाहूया,
  • युवराज सिंग – वि. स्टुअर्ट ब्रॉड (दरबान, २००८)
  • कायरन पोलार्ड – वि. अकिला धनंजया (कूलिज. २०२१)
  • रोहित शर्मा व रिंकू सिंग – वि. करीम जनत (बंगळुरू, २०२४)
  • दिपेंद्र सिंग ऐरी – वि. कामरान खान (अल अमेरत, २०२४)
  • निकोलस पुरन – वि. अझमतुल्ला ओमारझाई (सेंट ल्युसिया, २०२४)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.