Nikhat Zareen : ‘प्रत्येक स्पर्धेनं माझा खेळ सुधारला आहे,’ ऑलिम्पिकपूर्वी निखत झरिनचा वाढला आत्मविश्वास

Nikhat Zareen : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये लवलिन आणि निखत या दोन अनुभवी खेळाडूंवर भारताची मदार आहे. 

146
Nikhat Zareen : ‘प्रत्येक स्पर्धेनं माझा खेळ सुधारला आहे,’ ऑलिम्पिकपूर्वी निखत झरिनचा वाढला आत्मविश्वास
  • ऋजुता लुकतुके

मागच्या दशकात महिला बॉक्सिंगमध्येही भारताने लक्षणीय कामगिरी केली असली तरी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पात्रता निकष पूर्ण करण्यासाठी मुष्टियोद्धांना यंदा बरेच सायास पडले. आणि त्यानंतर पॅरिससाठीचा भारतीय संघ तयार झाला आहे. अशावेळी संघात दोनच अनुभवी महिला खेळाडू आहेत, त्या म्हणजे निखत झरिन आणि टोकयो ऑलिम्पिकमध्ये कांस्य विजेती लवलिन बोरगोहेन. या दोघींतही आताचा फॉर्म आणि वय बघता निखतवरच भारताची पदकासाठी मदार असेल. आपल्या वरील जबाबदारीची निखतलाही जाणीव आहे. (Nikhat Zareen)

निखत ५० किलो वजनी गटांत उतरणार आहे. आणि हे तिचं पहिलंच ऑलिम्पिक असलं तरी दोन विश्वविजेतेपदं तिने आतापर्यंत मिळवली आहेत. तिच्याबरोबर लवलिना (७५ किलो वजनी गट), प्रीती पवार (५४ किलो) आणि परवीन हुडा (५७ किलो) या खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. पुरुषांमध्येही एकही खेळाडू अजून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला नाही. थायलंडमध्ये २५ मे ते २ जून दरम्यान होणारी ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा ही भारतीय खेळाडूंसाठी पात्रतेची अखेरची संधी असेल. (Nikhat Zareen)

(हेही वाचा – Chandrakant Patil : शरद पवारांचे राजकारण संपवण्याची भाषा; अजित पवार नाराज, बावनकुळेंनी सावरली बाजू)

अशावेळी लवलिना आणि निखतवरच भारतीयांचं लक्ष असणार आहे. आणि निखत ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी तसंच नाव कमावण्यासाठी उत्सुक आहे. तेलंगाणाची २७ वर्षीय मुष्टियोद्धा त्यासाठीच सराव करत आहे. ‘प्रत्येत लढत तुम्हाला काहीतरी शिकवत असते. आणि मी चुकांची पुनरावृत्ती करायची नाही, हेच शिकले आहे. शिवाय अधिकाधिक लढती खेळल्यानंतर मैदानात आणि बाहेरही शांत कसं राहायंच हे मी शिकले आहे. आता नियंत्रित आक्रमणावर मी भर देते,’ असं निखतने मीडियाशी बोलताना सांगितलं. आशियाई क्रीडास्पर्धेनंतर शांततेचं महत्त्व पटलं असल्याचं ती सांगते. निखतला ऑलिम्पिकवारीसाठी मागची दहा वर्ष झगडावं लागलं आहे. दिग्गज खेळाडू मेरी कोम असेपर्यंत तिला ऑलिम्पिक सहभागाची संधी मिळाली नव्हती. (Nikhat Zareen)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.