- ऋजुता लुकतुके
२०१८ मध्ये अमेरिकेत लॉस एंजेलिसला होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये मुष्टियुद्ध क्रीडा प्रकार असेल की नाही, हे २०२५ मध्ये ठरवलं जाईल, असं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी म्हटलं आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत एखाद्या क्रीडाप्रकार खेळवला जातो तेव्हा त्याच्या आयोजनाची जबाबदारी ही त्या त्या खेळाच्या आंतरराष्ट्रीय संघटनेकडे असते. पण, काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध संघटना आणि ऑलिम्पिक समिती यांच्यात वितुष्ट आलं आहे. ऑलिम्पिक समितीने मुष्टियुद्ध संघटनेची मान्यता काढून घेऊन यंदा मुष्टियुद्ध प्रकारात आयोजन स्वत:च्या हातात घेतलं. (No Boxing in Olympics)
(हेही वाचा – Raj Thackeray Visit : ‘मराठा विरुद्ध मनसे’ वाद लावण्याचे उबाठाचे षडयंत्र)
पण, यानंतर ऑलिम्पिकमध्ये मुष्टियुद्ध असेल की नाही यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे. आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध संघटना ऑलिम्पिक समितीच्या नियमांचं पालन करत नसल्याचा ठपका सध्या ऑलिम्पिक समितीने ठेवला आहे. सर्व देशांच्या मुष्टियुद्ध संघटनांनी एकत्र येऊन नवीन जागतिक संघटनेची स्थापना करावी असंही ऑलिम्पिक समितीचं मत आहे. (No Boxing in Olympics)
(हेही वाचा – Paris Olympic 2024 : अंतिम पनघल भारतात परतली, निर्दोष असल्याचा केला दावा )
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने मुष्टियुद्ध संघटनेवर पहिली कारवाई २०१९ मध्ये केली होती. या संघटनेतील आर्थिक व्यवहार, कामकाजाची पद्धत, रेफरींच्या नेमणुका आणि गुणपद्धती अशा सगळ्याच बाबतीत ऑलिम्पिक समितीने ठपका ठेवला आहे. २०२१ मध्ये ऑलिम्पिक समितीने मान्यता काढून घेतली. आता मुष्टियुद्ध प्रकार ऑलिम्पिकमध्ये राहणार का आणि राहिला तर तो कुठल्या संघटने अंतर्गत राहणार यावर चर्चा सुरू झाली आहे. (No Boxing in Olympics)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community