- ऋजुता लुकतुके
टेनिसमधील दिग्गज खेळाडू नोवाक जोकोविचसाठी (Novak Djokovic) सोमवारचा दिवस एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यात आसू घेऊन आला. प्रतिस्पर्धी फ्रान्सिस्को केरुनडोलो विरुद्धचा सामना जोकोविचने पाच सेटमध्ये ६-१, ५-७, ३-६, ७-५ आणि ६-३ असा विजय त्याने मिळवला. हा विजय ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतील त्याचा विक्रमी ३७० वा विजय ठरला. पण, सामन्यादरम्यान दुसऱ्या सेटमध्ये जोकोविच कोर्टवर घसरून पडला. आणि त्याचा पाय दुखावला. या दुखापतीमुळे त्याला उर्वरित स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे विक्रम साजरा होऊनही जोकोविच सध्या दुर्मुखलेला आहे. (Novak Djokovic)
जोकोविच (Novak Djokovic) यंदा २४ वं ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावण्याच्या इराद्याने मैदानात उतरला होता. बुधवारी त्याचा उपउपान्त्य फेरीतील सामना रुडशी होणार होता. आणि गेल्यावर्षी रुडला अंतिम सामन्यात हरवल्यामुळे जोकोविचचे हौसलेही बुलंद होते. पण, या दुखापतीमुळे सगळं गणित बिघडलं आहे. (Novak Djokovic)
(हेही वाचा – R Praggnanandhaa : आर प्रग्यानंदाचा चिनी जगज्जेता डिंग लिरेनलाही दे धक्का)
२४ वी ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न भंगलं
जोकोविचने फिलीप कार्टिअर मैदान निसरडं असल्याची तक्रार केली आहे. जोकोविचने (Novak Djokovic) सोमवारी सामन्यात दोनदा वैद्यकीय उपचारांसाठी ब्रेक घेतला. वेदनाशामक गोळ्यांचा मारा केला. त्यानंतर तो सामना जरी त्याने संपवला, तरी बुधवारचा सामना तो खेळू शकणार नाहीए. आयोजकांनी ही दु:खद बातमी दिली आहे. (Novak Djokovic)
‘उपउपांत्य फेरीच्या सामन्यात झालेल्या दुखापतीचा परिणाम जोकोविचच्या (Novak Djokovic) उजव्या गुडघ्यावर झाला आहे आणि एमआरआय स्कॅनमध्ये गुडघ्यातील काही स्नायू दुखावल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे जोकोविचने उर्वरित फ्रेंच ओपन स्पर्धेतून माघार घेतली आहे,’ असं आयोजकांनी पत्रक काढून जाहीर केलं आहे. ३७ वर्षीय जोकोविचचं २४ वी ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न सध्या भंग पावलं आहे. (Novak Djokovic)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community