- ऋजुता लुकतुके
वर्षाच्या शेवटी एटीपी क्रमवारीत अव्वल स्थान राखण्याची किमया नोवाक जोकोविचने (Novak Djokovic) विक्रमी ८ वेळा केली आहे. (Novak Djokovic No 1)
सर्बियन लॉन टेनिस स्टार नोवाक जोकोविचने (Novak Djokovic) टेनिस कोर्टवरील आपलं प्रभुत्व पुन्हा एकदा सिद्ध करताना एटीपी स्पर्धांचा वर्षभराचा कार्यक्रम संपल्यावर क्रमवारीतील अव्वल स्थान आपल्याकडे राखण्याचा पराक्रम आठव्यांदा केला आहे. म्हणजे वर्षअखेर तोच अव्वल ठरला आहे. (Novak Djokovic No 1)
२४ ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचा विक्रम नावावर असलेला जोकोविच खरंतर दुखापतीमुळे २०२३ वर्षात सातत्याने खेळलेला नाही. पण, तरीही ऑस्ट्रेलियन, फ्रेंच आणि युएस ओपन या ग्रँडस्लॅम स्पर्धा त्याने जिंकल्याच. एटीपी हंगामात शेवटच्या टप्प्यात त्याची स्पर्धा विम्बल्डन विजेत्या कार्लोस अल्काराझशी होती आणि दोघांमध्ये क्रमवारीत स्पर्धा दिसून आली. (Novak Djokovic No 1)
पण, हंगामाच्या शेवटच्या ग्रँड फिनाले स्पर्धेत जोकोविचने पुन्हा एकदा अल्काराझला मागे टाकलं. ट्युरिन इथं झालेल्या अंतिम स्पर्धेत मिळलेला विजय हा जोकोविचचा (Novak Djokovic) एटीपी अंतिम स्पर्धेत मिळवलेला आठवा विजय आहे आणि आता आठव्यांदा तो हंगाम संपवताना अव्वल क्रमांकावर राहिला आहे. (Novak Djokovic No 1)
२०२३ वर्षाची सुरुवातही त्याने अव्वल पदावरून केली होती. सलग ४०० आठवड्यांपेक्षा जास्त काळ अव्वल पदावर राहण्याचा विक्रम तेव्हा त्याने केला होता. या बाबतीत जोकोविच (Novak Djokovic) हा रॉजर फेडररच्या बरोबर आहे. रॉजर फेडररच्या नावावर सलग पंघरा वर्षं पहिल्या तीनात राहण्याचा विक्रम आहे. (Novak Djokovic No 1)
(हेही वाचा – Marathi Sign Board : मराठी पाट्यांवरून मनसेचा ठाण्यातील दुकानदारांना तीन दिवसांचा अल्टिमेटम)
पुढील वर्षी २२ जानेवारीपर्यंत जोकोविच (Novak Djokovic) पहिल्या क्रमांकावर कायम असेल. (Novak Djokovic No 1)
२०२४ चा एटीपी हंगाम २९ डिसेंबरला ऑस्ट्रेलियात होणाऱ्या युनायटेड कप स्पर्धेनं सुरू होईल. त्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन ही पहिली ग्रँडस्लॅम होईल. एटीपी क्रमवारीत नोवाक जोकोविचचं वर्चस्व कायम असलं तरी तरुण टेनिसपटूंनीही आपलं कसब यंदा दाखवून दिलं आहे. २० वर्षीय होल्गर रुन आठव्या तर यानिक सिनर चौथ्या क्रमांकावर आहेत. या दोघांकडे भविष्यातील आशेचा किरण म्हणून पाहिलं जात आहे. (Novak Djokovic No 1)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community