- ऋजुता लुकतुके
नोवाक जोकोविचला (Novak Djokovic) रोम ओपन स्पर्धेत तिसऱ्या फेरीत पराभवाचा दणका बसला. अलेक्झांड्रो ताबिलोने त्याचा ६-३ आणि ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. ताबिलो जागतिक क्रमवारीत सध्या ३२ व्या स्थानावर आहे. आणि पहिल्या दहांत असलेल्या खेळाडूला हरवण्याची त्याची ही पहिलीच वेळ आहे. तर जोकोविचच्या या पराभवामुळे त्याचं ४१ वी मास्टर्स स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न सध्या भंग झालं आहे. या आधीच्या फेरीत कॉरेंटिन मोटेट विरुद्ध मिळवलेल्या विजयानंतर जोकोविचला एक छोटा अपघात झााला होता. काचेची बाटली अनावधानाने जोकोविचच्या डोक्यावर बसली होती. (Novak Djokovic)
त्यानंतर जोकोविचने (Novak Djokovic) सराव करताना सायकलस्वार घालतात तसं हेलमेट घातलं होतं. तो जोकोविचच्या विनोदी स्वभावाचा भाग असला तरी त्या अपघाताचा त्याच्या कामगिरीवरही परिणाम झाल्याचं स्पष्टपणे दिसलं. फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धा जवळ आली असताना जोकोविचला हा मोठा धक्का बसला आहे. (Novak Djokovic)
(हेही वाचा – IPL 2024, Virat, Ishant Banter : बंगळुरू, दिल्ली सामन्यात विराट आणि ईशांत यांची अशी जुंपली)
तर रोम ओपन ही क्ले कोर्टवरील लोकप्रिय स्पर्धा आहे. पण, यंदा अव्वल मानांकित यानिक सिनर आणि कार्लोस अल्काराझ या स्पर्धेत खेळत नाहीएत. त्यामुळे तिची रंगत कमी झाली आहे. राफेल नदालचा दुसऱ्याच फेरीत पराभव झाला आहे. तर इटलीचे स्थानिक खेळाडू माटिओ बोरेटिनी आणि लॉरेंझो मुसेटी या स्पर्धेत खेळत नसल्यामुळे प्रेक्षकांचाही प्रतिसाद स्पर्धेला मिळताना दिसत नाही. (Novak Djokovic)
ताबिलोनं जोकोविचवर (Novak Djokovic) दोन्ही सेटमध्ये वर्चस्व गाजवलं. पहिल्या सेटमध्ये सुरुवातीलाच ताबिलोनं ४-० अशी आघाडी घेतली आणि तिथून त्याने मागे वळून पाहिलं नाही. दोन्ही सेटमध्ये सुरुवातीलाच ताबिलोनं जोकोविचची सर्व्हिस भेदली. (Novak Djokovic)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community